ICC T20 World Cup 2021, AFG vs NZ, Live: न्यूझीलंडचा अफगाणिस्तानवर विजय, भारताचं आव्हान संपुष्टात

ICC T20 World Cup 2021, AFG vs NZ, Live Updates: ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीसाठीचा चौथा संघ निश्चित झाला आहे. अफगाणिस्तानवर मात करत न्यूझीलंडनं उपांत्य फेरीत धडक मारली आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2021 06:38 PM2021-11-07T18:38:30+5:302021-11-07T18:51:24+5:30

whatsapp join usJoin us
ICC T20 World Cup 2021 AFG vs NZ Live updates new zealand beat afghanistan by 8 wickets | ICC T20 World Cup 2021, AFG vs NZ, Live: न्यूझीलंडचा अफगाणिस्तानवर विजय, भारताचं आव्हान संपुष्टात

ICC T20 World Cup 2021, AFG vs NZ, Live: न्यूझीलंडचा अफगाणिस्तानवर विजय, भारताचं आव्हान संपुष्टात

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC T20 World Cup 2021, AFG vs NZ, Live Updates: ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीसाठीचा चौथा संघ निश्चित झाला आहे. अफगाणिस्तानवर मात करत न्यूझीलंडनं उपांत्य फेरीत धडक मारली आहे. न्यूझीलंडच्या या विजयासह भारताचं ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत आव्हान देखील आता संपुष्टात आलं आहे. अबूधाबीच्या स्टेडियमवर झालेल्या आजच्या सामन्यात न्यूझीलंडनं अफगाणिस्तानवर ८ विकेट्सनं विजय प्राप्त केला. या विजयासह न्यूझीलंडनं ८ गुणांसह गुणतालिकेत दुसरं स्थान गाठलं आहे. 

ट्वेन्टी-२० च्या उपांत्य फेरीत इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांनी प्रवेश केला आहे. भारतीय संघाचा उद्या नामिबिया विरोधात एक सामना होणार आहे. पण नामिबिया विरुद्धच्या लढतीत भारताला विजय प्राप्त करुन ६ गुणांसह तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागणार आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड प्रत्येकी ८ गुणांसह अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानावर आहेत. 

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन विजयाचा शिल्पकार ठरला. संघाची सलामीजोडी तंबूत दाखल झालेली असताना विल्यमसन यानं मैदानात जम बसवत संघाला विजय प्राप्त करुन दिला. विल्यमसननं ४२ चेंडूत नाबाद ४० धावांची खेळी साकारली. तर कॉनवेनं ३२ चेंडूत नाबाद ३६ धावांची खेळी साकारली. मार्टिन गप्टिल (२८) आणि मिशेल (१७) यांना बाद करण्यात अफगाणिस्तानच्या गोलंदाजांना यश आलं. 

अफगाणिस्ताननं आज नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण न्यूझीलंडच्या टीम साऊदी आणि ट्रेंट बोल्ट यांनी अफगाणिस्तानच्या फलंदाजांना एकामागोमाग एक तंबूत धाडलं. २० षटकांच्या अखेरीस अफगाणिस्तानला ८ बाद १२४ धावाच करता आल्या होत्या. यातही नजीबुल्लाह जादरान यानं ७३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. त्यामुळे अफगाणिस्तानला १०० चा आकडा ओलांडता आला. किवी गोलंदाजी पुढे अफगाणिस्तानचे फलंदाज एकामागोमाग एक नांगी टाकत असताना नजीबुल्लाह जादरान यानं मैदानात जम बसवत संघाला समाधानकारक धावसंख्या गाठून दिली आहे. नजीबुल्लाह जादरान यानं ४८ चेंडूत ७३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. यात ३ षटकार आणि ६ चौकारांचा समावेश होता. जादरान वगळता अफगाणिस्तानकडून इतर कोणताही फलंदाज विशेष कामगिरी करू शकला नाही. 

Web Title: ICC T20 World Cup 2021 AFG vs NZ Live updates new zealand beat afghanistan by 8 wickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.