T20 World Cup 2021 Eng vs WI Live Score: गतविजेत्या वेस्ट इंडिजची वाईट अवस्था, इंग्लंडच्या गोलंदाजांनी दिला जबरदस्त दणका!

ICC T20 World Cup 2021 England vs West Indies Scoreacard Live updates : इंग्लंडच्या गोलंदाजांनी आज अक्षरशः वेस्ट इंडिजची नाचक्की केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 08:47 PM2021-10-23T20:47:58+5:302021-10-23T20:48:45+5:30

whatsapp join usJoin us
ICC T20 World Cup 2021 Eng vs WI Live updates : West Indies bundled out for 55 runs against England in the T20 World Cup 2021 | T20 World Cup 2021 Eng vs WI Live Score: गतविजेत्या वेस्ट इंडिजची वाईट अवस्था, इंग्लंडच्या गोलंदाजांनी दिला जबरदस्त दणका!

T20 World Cup 2021 Eng vs WI Live Score: गतविजेत्या वेस्ट इंडिजची वाईट अवस्था, इंग्लंडच्या गोलंदाजांनी दिला जबरदस्त दणका!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC T20 World Cup 2021 England vs West Indies Scoreacard Live updates : इंग्लंडच्या गोलंदाजांनी आज अक्षरशः वेस्ट इंडिजची नाचक्की केली. तसंही विंडीज खेळाडूंच्या कामगिरीबाबात कोणीही ठाम मत मांडूच शतक नाही. कॅरेबियन बेटांवरील लहरी वाऱ्यांप्रमाणे त्यांचा खेळही असतो आणि याची प्रचिती आजच्या लढतीत आली. इंग्लंडच्या गोलंदाजांना फक्त तो लहरीपणा ओळखून त्यांच्या वाट्याला आलेली भूमिका पार पाडायची होती आणि त्यांनी ती योग्य वटवली. ४१ वर्षीय ख्रिस गेल ( Chris Gayle) हा एकमेव फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला. आदील राशिद, मोईन अली यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. 

इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला अन् मोइन अलीनं ( Moeen Ali) कर्णधार इयॉन मॉर्गनचा हा निर्णय योग्य ठरवला. चेन्नई सुपर किंग्सच्या ( CSK) अष्टपैलू खेळाडूनं गोलंदाजीत छाप पाडताना पहिल्या तीन षटकांत २ विकेट्स घेत वेस्ट इंडिजला जबरदस्त दणके दिले. ख्रिस वोक्सनं दुसऱ्या षटकात विंडीजचा सलामीवीर एव्हिन लुईसला ( ६) बाद केले, लुईसनं टोलावलेला उत्तुंग चेंडू मोईन अलीनं सुरेखपद्धतीनं झेलला. त्यानंतर मोईन अलीनं गोलंदाजीत कमाल दाखवताना लेंडल सिमन्स ( ३) व शिमरोन हेटमायर ( ९) यांना बाद करून गतविजेत्यांचे कंबरडे मोडले. 

मोईन अली - ४ षटक, १ निर्धाव, १७ धावा, २ विकेट्स
पहिले षटक -  0, 0, 1, 0, 0, 6
दुसरे षटक - 0, W, 0, 0, 0, 0
तिसरे षटक -  4, 4, 0, W, 0, 0
चौथे षटक  0, 0, 0, 1, 1, 0


हे धक्के कमी होते की काय, टामल मिल्स, ख्रिस जॉर्डन व आदील राशीद यांनीही विंडीजची अवस्था वाईट केली. राशिदनं आंद्रे रसेलची घेतलेली विकेट पाहण्यासारखी होती. रसेलला भोपळाही फोडता आला नाही. ख्रिस गेल १३ धावा करून माघारी परतला. विंडीजचे ७ फलंदाज ४४ धावांत माघारी परतले होते. कर्णधार किरॉन पोलार्ड ( ६) एकटा खिंड लढवेल असे वाटत असताना राशिदनं त्यालाही फिरकीच्या जाळ्यात ओढले अन् जॉनी बेअरस्टोनं त्याला सोपा झेल टिपला. त्याच षटकात ओबेड मॅकॉय ( ०) बाद झाला. राशिदनं अखेरची विकेट घेत विंडीजचा संपूर्ण संघ ५५ धावांवर माघारी पाठवला. राशिदनं २ धावा देताना ४ विकेट्स घेतल्या.  ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील ही तिसरी निचांक धावसंख्या ठरली.  


 

Web Title: ICC T20 World Cup 2021 Eng vs WI Live updates : West Indies bundled out for 55 runs against England in the T20 World Cup 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.