T20 World Cup 2021 Ind vs NZ Live Score: टीम इंडिया १८ वर्षांचा विजयाचा दुष्काळ संपवणार; न्यूझीलंडला प्रथमच हरवणार?; महेंद्रसिंग धोनीलाही हे जमलं नाही

ICC T20 World Cup 2021 India vs New Zealand  Scoreacard Live updates : भारतीय चाहते आज संघाच्या विजयासाठी प्रार्थना करत असतील. पा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2021 04:23 PM2021-10-31T16:23:15+5:302021-10-31T16:24:22+5:30

whatsapp join usJoin us
ICC T20 World Cup 2021 Ind vs NZ Live updates : Can Virat Kohli break 18 year old New Zealand jinx? Can India take revenge vs Kiwis?  | T20 World Cup 2021 Ind vs NZ Live Score: टीम इंडिया १८ वर्षांचा विजयाचा दुष्काळ संपवणार; न्यूझीलंडला प्रथमच हरवणार?; महेंद्रसिंग धोनीलाही हे जमलं नाही

T20 World Cup 2021 Ind vs NZ Live Score: टीम इंडिया १८ वर्षांचा विजयाचा दुष्काळ संपवणार; न्यूझीलंडला प्रथमच हरवणार?; महेंद्रसिंग धोनीलाही हे जमलं नाही

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC T20 World Cup 2021 India vs New Zealand  Scoreacard Live updates : भारतीय चाहते आज संघाच्या विजयासाठी प्रार्थना करत असतील. पाकिस्ताननं पहिल्याच सामन्यात पराभवाचा धक्का दिल्यानंतर ७ दिवसांनी टीम इंडिया मैदानावर उतरणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर ही लढत होणार आहे आणि विराट अँड कंपनीसमोर न्यूझीलंडचे आव्हान आहे. टीम इंडियाला उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी आजचा सामना जिंकावा लागणार आहे. भारतीय संघासाठी ही लढत सोपी नक्कीच नसणार आहे, मागील १८ वर्षांत आयसीसीच्या स्पर्धांमध्ये टीम इंडियाला किवींवर विजय मिळवता आलेलं नाही. 
 टीम इंडियानं २००३मध्ये वर्ल्ड कप स्पर्धेत सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडवर अखेरचा विजय मिळवला होता.  

  • २०२१ जागतिक कसोटी अजिंक्यपद फायनल - न्यूझीलंडचा ८ विकेट्स राखून भारतावर विजय, साऊदॅम्प्टन
  • २०१९ वर्ल्ड कप उपांत्य फेरीत - न्यूझीलंडची १८ धावांनी भारतावर मात, मँचेस्टर
  • २०१६ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप - न्यूझीलंडचा ४७ धावांनी भारतावर विजय, नागपूर
  • २००७ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप - न्यूझीलंडचा १० धावांनी भारतावर विजय, जोहान्सबर्ग
  • २००३ वर्ल्ड कप - भारताचा ७ विकेट्स राखून न्यूझीलंडवर विजय, सेंच्युरियन  

 
केन विलियम्स अँड कंपनीनं दोनवेळा विराट अँड कंपनीवर विजय मिळवला आहे.

  •  २०२१ जागतिक कसोटी अजिंक्यपद फायनल - न्यूझीलंडचा ८ विकेट्स राखून भारतावर विजय, साऊदॅम्प्टन
  • २०१९ वर्ल्ड कप उपांत्य फेरीत - न्यूझीलंडची १८ धावांनी भारतावर मात, मँचेस्टर

 

भारत-न्यूझीलंड आमनेसामने

  • एकूण सामने - १८
  • भारत - ९ 
  • न्यूझीलंड - ९  

 

३१ ऑक्टोबर  ठरलाय न्यूझीलंडसाठी घातक
३१ ऑक्टोबर १९८७मध्ये वर्ल्ड कप स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंड यांच्यात नागपूर येथे सामना झाला होता. त्यात चेतन शर्मा यांनी वर्ल्ड कप स्पर्धेत हॅटट्रिक घेण्याचा पहिला मान मिळवला होता, तर सुनील गावस्कर यांनी वन डेतील पहिले शतक झळकावले होते.  
 

Web Title: ICC T20 World Cup 2021 Ind vs NZ Live updates : Can Virat Kohli break 18 year old New Zealand jinx? Can India take revenge vs Kiwis? 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.