ICC T20 World Cup 2021 India vs New Zealand Scoreacard Live updates : ‘भरवशाच्या म्हशीला टोणगा’ या म्हणीची प्रचीती आजच्या सामन्यात टीम इंडियाला आली... करो वा मरो लढतीत टीम इंडियाच्या फलंदाजांकडून आज दमदार खेळीची अपेक्षा होती, पण न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी त्यांची हवाच काढली. संघात बदल केले, सलामीची जोडी बदलून पाहिली, विराट कोहलीनंही त्याचा फलंदाजीचा क्रम बदलला, परंतु हाती काय आलं? काहीच नाही. भारताचे हे दिग्गज 'फुसके फटाके' निघाले. या खेळपट्टीवर धावा करणे अवघड होते, परंतु अशक्य नक्कीच नव्हते. संयमाच्या कसोटीत टीम इंडियाचे फलंदाज नापास ठरले. चुकीच्या फटक्यांनी टीम इंडियाचा घात केला आणि आता गोलंदाजांवर सर्व भीस्त आहे.
भारत-न्यूझीलंड यांच्यातला हा सामना खऱ्या अर्थानं उपांत्यपूर्व फेरीचा सामना आहे. या सामन्यातील विजयी संघ उपांत्य फेरीच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकेल आणि त्यामुळेच दोन्ही संघ ताकदीनं मैदानावर उतरले आहेत. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्मा संघात असूनही इशान किशन व लोकेश राहुल ही जोडी सलामीला आली. दोघांनी सुरुवातीला संयम दाखवला, परंतु इशाननं तिसऱ्या षटकात चौकार मारून माहोल बदलण्याचा प्रयत्न केला. पण, ही अती घाई महागात पडली अन् ट्रेंट बोल्टनं त्याची विकेट घेतली. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या रोहितचा पहिल्याच चेंडूवर अॅडम मिल्नेनं सोपा झेल सोडला. T20 World Cup 2021, T20 World Cup 2021 matches
रोहितनं मारलेल्या पुल शॉटनंतर चेंडू हवेत होता अन् सीमारेषेवर मिल्ने उभाच होता. रोहित भोपळ्यावर बाद होतोय की काय असेच वाटत होते आणि प्रेक्षकांमध्ये बसलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर टेंशन दिसले. त्याला रोहितची पत्नी रितिकाही अपवाद ठरली नाही. पण, मिल्नेनं सोपा झेल सोडताच प्रेक्षकांप्रमाणे तिनंही सुटकेचा निश्वास टाकला. त्यानंतर मिल्नेच्या गोलंदाजीवर रोहितनं मारलेला षटकार अप्रतिम होता. पण, टीम साऊदीनं टीम इंडियाला दुसरा धक्का देताना लोकेशला ( १८) माघारी जाण्यास भाग पाडले. भारतानं ३५ धावांवर दोन्ही सलामीवीर गमावले. जीवदान मिळालेल्या रोहितला संयमानं खेळताच आले नाही. ८व्या षटकात केननं चेंडू इश सोढीच्या हाती सोपवला अन् रोहित त्याच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या प्रयत्नात १४ धावांवर झेलबाद झाला. T20 World Cup 2021 live updates, T20 World Cup 2021 schedule
४० धावांवर आघाडीचे तीनही फलंदाज माघारी परतल्यामुळे पुन्हा एकदा कर्णधार विराट कोहलीच्या ( Virat Kohli) खांद्यावर जबाबदारी आली. भारताला पहिल्या १० षटकांत ३ बाद ४८ धावा करता आल्या. धावा होत नसल्यानं आणि ‘भरवशाच्या म्हशीला टोणगा’ या म्हणीची प्रचीती आल्यामुळे विराट दडपणाखाली गेला. म्हणूनच त्यानं ११ व्या षटकात सोढीनं टाकलेला चेंडू उत्तुंग टोलावला, परंतु सीमारेषेवर ट्रेंट बोल्टनं त्याच ( ९) झेल टिपला. मिचेल सँटनरला विकेट घेता आली नसली तरी त्यानं ४ षटकांत फक्त १५ धावा देत टीम इंडियावर प्रचंड दडपण निर्माण केलं होतं. हार्दिक पांड्याला ( Hardik Pandya) आज महेंद्रसिंग धोनीचा विश्वास सार्थ करण्याची पुरेपूर संधी मिळाली. रिषभ पंतकडून ( Rishabh Pant) आज अपेक्षा होत्या, परंतु १२ धावांवर मिल्नेनं त्याचा त्रिफळा उडवला. भारताचा निम्मा संघ ७० धावांवर माघारी परतला होता. Ind vs NZ live score, Ind vs NZ live scorecard