Join us  

T20 World Cup 2021 Ind vs NZ Live Score: टीम इंडियाची खराब अवस्था पाहून पाकिस्तानी खेळाडू Live Show मध्ये नाचू लागले, Video 

ICC T20 World Cup 2021 India vs New Zealand  Scoreacard Live updates : न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर  टीम इंडियाचे तगडे फलंदाज अपयश ठरले. भारतानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत प्रथम फलंदाजी करताना सर्वात निचांक खेळीची नोंद केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2021 9:35 PM

Open in App

ICC T20 World Cup 2021 India vs New Zealand  Scoreacard Live updates : पाकिस्तानविरुद्धचा पराभव विसरून मिळालेल्या एक आठवड्यांच्या विश्रांती कालावधीत टीम इंडियात सकारात्मक बदल पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. पण, न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर  टीम इंडियाचे तगडे फलंदाज अपयश ठरले. भारतानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत प्रथम फलंदाजी करताना सर्वात निचांक खेळीची नोंद केली. टीम इंडियाची ही अवस्था पाहून पाकिस्तानचे माजी खेळाडू भलतेच खूश झालेले पाहायला मिळाले. Live Show मध्ये मिसबाह उल हक, वसीम अक्रम, वकार युनूस आणि वाहब रियाझ हे नाचताना दिसले. ( संपूर्ण धावफलक एका क्लिकवर

इशान किशन व लोकेश राहुल ही नवी जोडी सलामीला आली, परंतु त्याचा काही फायदा झाला नाही. इशान किशन ( ४) तिसऱ्या षटकात माघारी परतला. रोहित शर्माला पहिल्याच चेंडूवर जीवदान मिळाले, परंतु त्याला मोठी खेळी करता आली नाही. तो १४ धावांवर व लोकेश राहुल १८ धावांवर माघारी परतले. ४० धावांवर आघाडीचे तीनही फलंदाज माघारी परतल्यामुळे पुन्हा एकदा कर्णधार विराट कोहलीच्या ( Virat Kohli) खांद्यावर जबाबदारी आली. धावा होत नसल्यानं आणि ‘भरवशाच्या म्हशीला टोणगा’ या म्हणीची प्रचीती आल्यामुळे विराट दडपणाखाली गेला. म्हणूनच त्यानं ११ व्या षटकात सोढीनं टाकलेला चेंडू उत्तुंग टोलावला, परंतु सीमारेषेवर ट्रेंट बोल्टनं त्याच ( ९) झेल टिपला. 

मिचेल सँटनरला विकेट घेता आली नसली तरी त्यानं ४ षटकांत फक्त १५ धावा देत टीम इंडियावर प्रचंड दडपण निर्माण केलं होतं. हार्दिक पांड्याला ( Hardik Pandya) आज  पुरेपूर संधी मिळाली. रिषभ पंतकडून ( Rishabh Pant) आज अपेक्षा होत्या, परंतु १२ धावांवर मिल्नेनं त्याचा त्रिफळा उडवला. भारताचा निम्मा संघ ७० धावांवर माघारी परतला होता. इश सोढीनं ४ षटकांत १७ धावांत २ महत्त्वाच्या ( रोहित व विराट) विकेट्स घेतल्या. हार्दिकनं १७व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर चौकार मारला. तब्बर ७१ चेंडूंनंतर टीम इंडियाला प्रथमच सीमापार करता आली. मिल्नेनं ३० धावांत १ विकेट घेतली. हार्दिकनं पुन्हा निराश केलं. तो २३ धावा करून माघारी परतला. शार्दूल ठाकूरही भोपळ्यावर बाद झाला. त्याची विकेट घेत बोल्टनं बळींचं अर्धशतक पूर्ण केलं. बोल्टनं २० धावांवर ३ विकेट्स घेतल्या. रवींद्र जडेजानं नाबाद २६ धावा केल्या, भारताला ७ बाद ११० धावाच करता आल्या. 

पाहा पाकिस्तनी माजी खेळाडूंचा डान्स... 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१भारत विरुद्ध न्यूझीलंडपाकिस्तानवसीम अक्रम
Open in App