ICC T20 World Cup 2021 India vs New Zealand Scoreacard Live updates : भारतीय चाहत्यांनी आज खरंच घरातील टीव्ही नक्की फोडले असतील. आयसीसी स्पर्धेतील न्यूझीलंडविरुद्धचे पराभवाचे चक्र टीम इंडियाला आजही भेदता आलं नाही. भारतीय फलंदाजांनी लाजीरवाणी कामगिरी केल्यानंतर गोलंदाजांसाठी काही करण्यासारखंच राहिलं नाही. केवळ नाईलाज म्हणून त्यांना गोलंदाजी करावी लागली. भारताचे फलंदाज आज कागदी 'वाघ' ठरले. या सामन्यातील सकारात्मक बाब म्हणजे टीम इंडियाला विकेट घेता आल्या आणि हार्दिक पांड्यानं ( Hardik Pandya) गोलंदाजी केली. आता टीम इंडियाला अन्य संघांच्या कामगिरीवर अवलंबून रहावं लागणार आहे.
इशान किशन व लोकेश राहुल ही नवी जोडी अपयशी ठरली. इशान किशन ( ४) तिसऱ्या षटकात माघारी परतला. रोहित शर्माला पहिल्याच चेंडूवर जीवदान मिळाले, परंतु त्याला मोठी खेळी करता आली नाही. तो १४ धावांवर व लोकेश राहुल १८ धावांवर माघारी परतले. ४० धावांवर आघाडीचे तीनही फलंदाज माघारी परतल्यामुळे पुन्हा एकदा कर्णधार विराट कोहलीच्या ( Virat Kohli) खांद्यावर जबाबदारी आली. धावा होत नसल्यानं विराट दडपणाखाली गेला. म्हणूनच त्यानं ११ व्या षटकात सोढीनं टाकलेला चेंडू उत्तुंग टोलावला, परंतु सीमारेषेवर ट्रेंट बोल्टनं त्याच ( ९) झेल टिपला. T20 World Cup 2021, T20 World Cup 2021 matches
प्रत्युत्तरात, न्यूझीलंडच्या फलंदाजांनी चुका केल्या नाही. मार्टीन गुप्तीलनं १७ चेंडूंत ३ चौकारांसह २० धावांवर बाद झाला. २१.३ षटकांनंतर टीम इंडियाला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पहिली विकेट घेण्यात यश आलं. जसप्रीत बुमराहनं ही विकेट घेतली. गोलंदाजीत फार कमाल करत नसूनही विराटनं वरुण चक्रवर्थीची चार षटकं झटपट पूर्ण करून घेतली. केन विलियम्सन व डॅरील मिचेल यांना सेट होण्याची त्यामुळेच संधी मिळाली. या दोघांनी संयमी खेळ करताना दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. मिचेल अगदी सहजतेनं टीम इंडियाच्या गोलंदाजांना षटकार खेचत होता. केन व मिचेल यांनीच न्यूझीलंडला विजय मिळवून दिला. T20 world cup news in marathi, T20 World Cup Ind vs NZ live scorecard
जसप्रीतनं दुसरी विकेट घेताना मिचेलला बाद केले. मिचेल ३५ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ४९ धावांवर बाद झाला आणि केनसह त्याची ७२ धावांची भागीदारीही संपुष्टात आली. पण केननं खिंड लढवताना न्यूझीलंडचा सहज विजय मिळवून दिला. न्यूझीलंडनं हा सामना ८ विकेट्सनं जिंकला.
१८ वर्षांची परंपरा कायम....
- २०२१ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप - न्यूझीलंडचा भारतीय संघावर ८ विकेट्स राखून विजय, दुबई
- २०२१ जागतिक कसोटी अजिंक्यपद फायनल - न्यूझीलंडचा ८ विकेट्स राखून भारतावर विजय, साऊदॅम्प्टन
- २०१९ वर्ल्ड कप उपांत्य फेरीत - न्यूझीलंडची १८ धावांनी भारतावर मात, मँचेस्टर
- २०१६ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप - न्यूझीलंडचा ४७ धावांनी भारतावर विजय, नागपूर
- २००७ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप - न्यूझीलंडचा १० धावांनी भारतावर विजय, जोहान्सबर्ग
- २००३ वर्ल्ड कप - भारताचा ७ विकेट्स राखून न्यूझीलंडवर विजय, सेंच्युरियन