ICC T20 World Cup 2021 India vs New Zealand Scoreacard Live updates : भारत-न्यूझीलंड यांच्यातील ट्वेंटी-२० सामन्यातील जय-पराजयाची आकडेवारी ही ९-९ अशी समसमान आहे. पण, जेव्हा आयसीसी स्पर्धांचा विषय येतो, तेव्हा भारताला मागील १८ वर्षांत एकदाही न्यूझीलंडवर विजय मिळवता आलेला नाही. पण, २००३नंतरचा हा दुष्काळ टीम इंडियाला संपवावाच लागेल, अन्यथा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील त्यांचे आव्हान संपुष्टात येईल. या संघात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनबाबत बरीच चर्चा झाली. माजी खेळाडूंनी विराट कोहली ( Virat Kohli) याला अनेक सल्ले दिले, पण त्यानं त्याच्या मनाचे ऐकले.. न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) हा सध्या टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधील चर्चेचा विषय ठरतोय. अष्टपैलू म्हणून संघात जागा पटकावणाऱ्या हार्दिकला अजूनही गोलंदाजी करता येत नाही. शस्त्रक्रियेनंतर त्यानं दोन वर्षांत एकही षटक फेकलेलं नाही. याचा अर्थ तो फलंदाजीत फार काही ग्रेट करतोय, असंही नाही. त्यामुळे त्याला बाकावर बसवण्याची मागणीनं जोर धरला होता.
भुवनेश्वर कुमार व वरुण चक्रवर्थी या दोन खेळाडूंच्या जागी शार्दूल ठाकूर व आर अश्विन यांना खेळवण्याचा अनेकांनी सल्ला दिला. टीम इंडियाचे खेळाडू सामन्यापूर्वी मैदानावर सराव करताना शार्दूल व हार्दिक गोलंदाजी करताना दिसले, परंतु भुवी कुठे दिसत नव्हता. त्याशिवाय सूर्यकुमार यादवच्या जागेवर इशान किशान खेळेल, असेही संकेत मिळत होते. T20 World Cup 2021, T20 World Cup 2021 matches,
२०१६पर्यंत टीम इंडियाला ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये एकदाही न्यूझीलंडवर विजय मिळवता आला नव्हता, परंतु त्यानंतर झालेल्या ११ पैकी ८ सामने भारतानं जिंकले. न्यूझीलंडनं आजच्या सामन्यात टीम सेईफर्टच्या जागी अॅडम मिल्ने खेळणार आहे. भारतीय संघात दोन बदल आहे. सूर्यकुमार यादवच्या जागेवर इशान किशान खेळेल आणि भुवीच्या जागी शार्दूल ठाकूर खेळणार आहे.
भारतीय संघ - रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, इशान किशन, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्थी
न्यूझीलंड संघ - मार्टीन गुप्तील, डॅरील मिचेल, केन विलियम्सन, डेव्हॉन कॉनवे, ग्लेन फिलिप्स, जिमी निशॅम, मिचेल सँटनर, अॅडम मिल्ने, टीम साऊदी, इश सोढी, ट्रेंट बोल्ट
Web Title: ICC T20 World Cup 2021 Ind vs NZ Live updates : New Zealand won the toss, Ishan Kishan and Shardul Thakur to come in for Suryakumar Yadav and Bhuvneshwar Kumar
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.