ICC T20 World Cup 2021 India vs New Zealand Scoreacard Live updates : भारत-न्यूझीलंड यांच्यातला हा सामना खऱ्या अर्थानं उपांत्यपूर्व फेरीचा सामना आहे. या सामन्यातील विजयी संघ उपांत्य फेरीच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकेल आणि त्यामुळेच दोन्ही संघ ताकदीनं मैदानावर उतरले आहेत. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. नाणेफेकीचा कौल टीम इंडियाच्या विरोधात लागल्यानं समर्थक काहीशे निराश झाले आहेत. पण, त्याहून अधिक निराशाजनक बाब म्हणजे टीम इंडियाला दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. संघातील स्फोटक फलंदाजाला डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. आजच्या सामन्यात इशान किशन व लोकेश राहुल ही जोडी सलामीला आली आहे.
भारत-न्यूझीलंड यांच्यातील ट्वेंटी-२० सामन्यातील जय-पराजयाची आकडेवारी ही ९-९ अशी समसमान आहे. पण, जेव्हा आयसीसी स्पर्धांचा विषय येतो, तेव्हा भारताला मागील १८ वर्षांत एकदाही न्यूझीलंडवर विजय मिळवता आलेला नाही. हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) हा सध्या टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधील चर्चेचा विषय ठरला होता, परंतु त्याला आणखी एक संधी देण्यात आली आहे. आजच्या सामन्यात दोन बदल करण्यात आले आहेत. सूर्यकुमार यादवच्या जागेवर इशान किशान खेळेल आणि भुवीच्या जागी शार्दूल ठाकूर खेळणार आहे. २०१६पर्यंत टीम इंडियाला ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये एकदाही न्यूझीलंडवर विजय मिळवता आला नव्हता, परंतु त्यानंतर झालेल्या ११ पैकी ८ सामने भारतानं जिंकले. न्यूझीलंडनं आजच्या सामन्यात टीम सेईफर्टच्या जागी अॅडम मिल्ने खेळणार आहे. T20 World Cup 2021, T20 World Cup 2021 matches,
सूर्यकुमार यादवला दुखापत
सूर्यकुमार यादवची पाठी दुखत असल्यानं आजच्या सामन्यात तो खेळत नाही. त्याला बीसीसीआयच्या वैद्यकिय टीमनं विश्रांतीचा सल्ला दिला असून तो हॉटेलमध्येच थांबला आहे, अशी माहिती बीसीसीआयनं दिली.
भारतीय संघ - रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, इशान किशन, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्थी
न्यूझीलंड संघ - मार्टीन गुप्तील, डॅरील मिचेल, केन विलियम्सन, डेव्हॉन कॉनवे, ग्लेन फिलिप्स, जिमी निशॅम, मिचेल सँटनर, अॅडम मिल्ने, टीम साऊदी, इश सोढी, ट्रेंट बोल्ट
Web Title: ICC T20 World Cup 2021 Ind vs NZ Live updates : Suryakumar Yadav complained of back spasms. He has been advised rest by the BCCI Medical Team, BCCI
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.