T20 World Cup 2021 Ind vs NZ Live Score: न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यासाठी वीरेंद्र सेहवागनं जाहीर केली टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन, वसीम अक्रमनंही दिला आपुलकीचा सल्ला 

ICC T20 World Cup 2021 India vs New Zealand  Scoreacard Live updates : भारत-न्यूझीलंड यांच्यातील ट्वेंटी-२० सामन्यातील जय-पराजयाची आकडेवारी ही ९-९ अशी समसमान आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2021 04:52 PM2021-10-31T16:52:26+5:302021-10-31T16:52:54+5:30

whatsapp join usJoin us
ICC T20 World Cup 2021 Ind vs NZ Live updates : virender sehwag announced Team India playing 11 for today game against New Zealand, Wasim Akram give advice | T20 World Cup 2021 Ind vs NZ Live Score: न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यासाठी वीरेंद्र सेहवागनं जाहीर केली टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन, वसीम अक्रमनंही दिला आपुलकीचा सल्ला 

T20 World Cup 2021 Ind vs NZ Live Score: न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यासाठी वीरेंद्र सेहवागनं जाहीर केली टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन, वसीम अक्रमनंही दिला आपुलकीचा सल्ला 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC T20 World Cup 2021 India vs New Zealand  Scoreacard Live updates : भारत-न्यूझीलंड यांच्यातील ट्वेंटी-२० सामन्यातील जय-पराजयाची आकडेवारी ही ९-९ अशी समसमान आहे. पण, जेव्हा आयसीसी स्पर्धांचा विषय येतो, तेव्हा भारताला मागील १८ वर्षांत एकदाही न्यूझीलंडवर विजय मिळवता आलेला नाही. त्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनवरून बरीच चर्चा सुरू आहे. हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) पूर्णपणे तंदुरुस्त नाही, त्यामुळे तो केवळ फलंदाज म्हणूनच संघात आहे. भारताला सहाव्या गोलंदाजाची उणीव जाणवतेय, भुवनेश्वर कुमार फॉर्मात नाही त्यामुळे आजच्या सामन्यात टीम इंडियाचे अंतिम ११ शिलेदार कोण असतील, याची उत्सुकता लागली आहे. त्यात माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग ( Virender Sehwag) यानं आजच्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. 

विराट कोहलीनं सांगितलं हार्दिक फिट पण.. 
विराट कोहलीनं काल झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, हार्दिक पांड्या हा पुर्णपणे बरा आहे. त्याच्या खांद्यावर झालेल्या दुखापतीबाबत तुम्ही विचारत असाल, तो तंदुरुस्त आहे.पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजांना विकेट घेण्यात अपयश आले आणि असं होऊ शकतो. नेमकं कुठे चुकलं हे आम्ही जाणून घेतलं आणि त्याचा स्वीकार केलाय, तोही कोणताही अहंकार न ठेवता आणि कारण न देता. त्यामुळे कोणा एकामुळे हरलो असं मी म्हणणार नाही, आम्ही संघ म्हणून हरलो.''

विरेंद्र सेहवागची प्लेइंग इलेव्हन 
रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्थी 

पाकिस्तानचा माजी गोलंदाज वसीम अक्रम काय म्हणाला?
न्यूझीलंडविरुद्धची लढत टीम इंडियासाठी सोपी नक्कीच नसेल. एका आठवड्याची विश्रांती वरदानही ठरू शकतो किंवा शापही... त्यानं मदतही मिळू शकते किंवा मरगळही येऊ शकतो. भारतीय संघानं सोशल मीडियावर काय चाललंय याकडे दुर्लक्ष करायला हवं. एक संघ म्हणून एकत्रित खेळायला हवं, असा सल्ला वसीम अक्रमनं दिला


 

Web Title: ICC T20 World Cup 2021 Ind vs NZ Live updates : virender sehwag announced Team India playing 11 for today game against New Zealand, Wasim Akram give advice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.