ICC T20 World Cup 2021 India vs Pakistan Scoreacard Live updates: भारत-पाकिस्तान लढतीसाठी शेजारील देशातून अनेक तज्ज्ञांचे सल्ले बाबर आजम अँड कंपनीला मिळत आहे. पण, पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर ( Shoaib Akhtar) यानं दिलेला सल्ला विचित्र आहे. इथे पाकिस्तानी संघाला रणनीती आखण्यासाठी अनेक माजी खेळाडू सल्ला देत असताना शोएब अख्तरनं दिलेला सल्ला पाहून हसावं की रडावं हेच चाहत्यांना कळेनासे झाले आहे.
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानला टीम इंडियावर एकही विजय मिळवता आलेला नाही, परंतु यावेळेस हे चित्र बदलेल असा दावा पाकिस्तानच्या आजी-माजी खेळाडूंकडून केला जात आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान व माजी कर्णधार इम्रान खान यांनीही इंशा-अल्लाह! यावेळी पाकिस्तान विजय मिळवेल, असा दावा केला आहे. त्यांनी बाबार आजम अँड कंपनीला १९९२च्या वर्ल्ड कपचे किस्से सांगून मनोबल उंचावण्याचा प्रयत्न केला.
शोएब अख्तरनं काय सल्ला दिला?
''भारतीय संघाला सर्वप्रथम झोपेच्या गोळ्या द्या. त्यानंतर दोन दिवस विराट कोहलीला इंस्टाग्रामपासून दूर ठेवा आणि तिसरा महेंद्रसिंग धोनीला तू फलंदाजीला येऊ नकोस, असं सांगा. तो आजही तितकाच धोकादायक आहे,''असे अख्तर Sportskeedaच्या एका कार्यक्रमात म्हणाला.
यावेळी अख्तरनं बाबर आजम व मोहम्मद रिझवान या जोडीला पाठींबा दिला. तो म्हणाला,'' पाकिस्तानला या सामन्यात दमदार सलामीची गरज आहे. त्यांनी निर्धाव चेंडू खेळणं टाळायला हवं आणि त्यांनी सुरुवातीच्या ५-६ षटकांत प्रत्येक चेंडूवर धावा करायला हव्यात, त्यानंतर धावांचा वेग वाढवायला हवा. जेव्हा तुम्ही आव्हानात्मक धावसंख्या उभी कराल तेव्हा गोलंदाजांना मदत मिळेल.''
या लढतीपूर्वी दोन्ही संघाचे कर्णधार काय म्हणाले?पाकिस्तानविरुद्धच्या स्पर्धेतील इतिहासाबद्दल आम्ही चर्चा करत नाही. आमच्यासाठी येणारा दिवस महत्त्वाचा आहे. आम्ही त्या सामन्यांत चांगला खेळ केला आणि म्हणून विजय मिळवला. पाकिस्तान हा तगडा संघ आहे आणि त्यांच्याकडे प्रतिभावान खेळाडू आहेत. अशा संघाविरुद्ध खेळताना चांगली रणनीती आखायला हवी आणि त्याचा अवलंबही व्हायला हवा
- विराट कोहली
इतिहास हा इतिहास झाला. आम्ही पुढचा विचार करत आहोत आणि विजयाचा निर्धार करूनच मैदानावर उतरणार आहोत.'' या सामन्याबद्दलच्या रणनीतीबाबतही बाबर म्हणाला,''आम्ही आतापर्यंत जसं खेळत आलोय, तसंच क्रिकेट खेळणार. मांइडसेटसाठी रणनीती तयार केली आहे. दडपणावर नियंत्रण कसं मिळवता येईल, यावर लक्ष असेल. स्वतःला शांत ठेऊन संघाला विजय मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न असेल.भूतकाळात काय घडलं याचा विचार करत नसून इतिहास घडवण्याचा विचार करतोय
- बाबर आजम
Web Title: ICC T20 World Cup 2021 Ind vs Pak Live updates : Shoaib Akhtar gives a hilarious advice to Pakistan before India match
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.