T20 World Cup 2021 Ind vs Pak Live Score: बाबर आजम-मोहम्मद रिझवान या दोघांनीच पाकिस्तानला सहज जिंकवले, वर्ल्ड कपमध्ये प्रथमच भारताला पराभूत केले

ICC T20 World Cup 2021 India vs Pakistan Scoreacard Live updates: पाकिस्तानविरुद्धची ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील टीम इंडियाची विजयाची ...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 11:01 PM2021-10-24T23:01:48+5:302021-10-24T23:02:23+5:30

whatsapp join usJoin us
ICC T20 World Cup 2021 Ind vs Pak Live updates : The streak is over! #Pakistan beat India by 10 wickets to register their maiden win vs India in World Cups. Pakistan chased down the 152 run target with 13 balls to spare | T20 World Cup 2021 Ind vs Pak Live Score: बाबर आजम-मोहम्मद रिझवान या दोघांनीच पाकिस्तानला सहज जिंकवले, वर्ल्ड कपमध्ये प्रथमच भारताला पराभूत केले

T20 World Cup 2021 Ind vs Pak Live Score: बाबर आजम-मोहम्मद रिझवान या दोघांनीच पाकिस्तानला सहज जिंकवले, वर्ल्ड कपमध्ये प्रथमच भारताला पराभूत केले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC T20 World Cup 2021 India vs Pakistan Scoreacard Live updates: पाकिस्तानविरुद्धची ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील टीम इंडियाची विजयाची मालिका आज खंडित झाली. पण, पाकिस्तानचा संघ इतक्या वाईट पद्धतीनं टीम इंडियाला पराभूत करेल, असे कुणाच्या ध्यानी मनी ही नव्हते. शाहिन शाह आफ्रिदीनं ( Shaheen Shah Afridi) दिलेल्या धक्क्यातून विराट कोहली व रिषभ पंतनं टीम इंडियाला सावरले. पण, खेळपट्टीचा रोख पाहता भारतीय गोलंदाजांना १५१ धावांचा बचाव करणे, सोपं नव्हते. मात्र, त्यांन एकही विकेट घेता आली नाही ही खरी शोकांतिका ठरली. पाकिस्ताननं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतावर पहिला विजय मिळवला अन् तोही दणक्यात... 

शाहिन शाह आफ्रिदीनं सुरुवातीला धक्के दिल्यानतंरही टीम इंडियानं आजच्या सामन्यात पाकिस्तानसमोर आव्हानात्मक धावसंख्या उभी केली.भारताचे आघाडीचे तीन फलंदाज ३१ धावांवर माघारी परतल्यानंतर कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) आणि रिषभ पंत ( Rishabh Pant) यांनी चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना टीम इंडियाचा डाव सावरला. रिषभ पुन्हा एकदा घाई करून माघारी परतला, पण त्यानं त्याची जबाबदारी सक्षमपणे पार पाडली. चौथ्या विकेटसाठी ४० चेंडूंत ५३ धावा जोडल्या आणि यात रिषभच्या ३९ धावा होत्या. विराट ४९ चेंडूंत ५ चौकार व १ षटकार खेचून ५७ धावांवर झेलबाद झाला. भारतानं २० षटकांत ७ बाद १५१ धावा केल्या. T20 World Cup 2021, T20 World Cup 2021 matches

बाबर आजम आणि मोहम्मद रिझवान ही फॉर्मात असलेली जोडी टीम इंडियावर भारी पडली. या दोघांनी वैयक्तिक अर्धशतकांसह पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. ट्वेंटी-२० क्रिकेटमधील ही त्यांची ४ शतकी भागीदारी ठरली आणि त्यांनी शिखर धवन/रोहित शर्मा व केन विलियम्सन व मार्टिन गुप्तील यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. बाबर व रिझवान ही जोडी सातत्यानं चांगली कामगिरी करत होती आणि त्यांना लवकर बाद करणे भारतीय गोलंदाजांना जमले नाही. World Cup 2021 live updates, T20 World Cup 2021 schedule


एकदा जम बसल्यावर मग पाकिस्तानच्या सलामीवीरांनी मागे वळून पाहिलेच नाही आणि भारतीय गोलंदाजांचा समाचार घेताना त्यांनी संघाला सहज विजय मिळवून दिला. विराट अँड कंपनी पाकिस्तानवर दबाव बनवण्यात सपशेल अपयशी ठरले. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत एकाच सामन्यात दोन्ही सलामीरांनी अर्धशतक झळकावण्याची ही दुसरी वेळ ठरली. यापूर्वी डेव्हिड वॉर्नर/ शेन वॉटसन ( ब्रिजटाऊन, २०१० व कोलंबो २०१२) यांनी दोनवेळा असा पराक्रम केला. बाबर ५२ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह नाबाद ६८ धावा केल्या. रिझवान ५५ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ७९ धावा केल्या. पाकिस्ताननं १७.५ षटकांत बिनबाद १५२ धावा केल्या.  Ind vs Pak live match, Ind vs Pak latest  score,   

Web Title: ICC T20 World Cup 2021 Ind vs Pak Live updates : The streak is over! #Pakistan beat India by 10 wickets to register their maiden win vs India in World Cups. Pakistan chased down the 152 run target with 13 balls to spare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.