ICC T20 World Cup 2021 India vs Pakistan Scoreacard Live updates: भारत-पाकिस्तान यांच्यातला महा मुकाबला अवघ्या तासाभरात सुरू होणार आहे. Hardik Pandya ची तंदुरुस्ती पाहता तो चार षटकं फेकेल, याची शक्यता कमी आहे. कर्णधार विराट कोहलीनंही ( Virat Kohli) हे कबुल केलं आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात भारताला सहाव्या गोलंदाजाची उणीव जाणवणार आहे. काही दिवसांपूर्वी रोहित शर्मानं सहावा गोलंदाज म्हणून स्वतःसह विराट कोहली व सूर्यकुमार यादव हे पर्याय सुचवले होते. काल विराटनंही यावर तोडगा काढू असे संकेत दिले. ( सामन्याचं संपूर्ण धावफलक)
दरम्यान, कालच्या सायंकाळच्या सराव सत्रात हार्दिक पांड्या गैरहजर राहिला. त्यामुळे त्याच्या खेळण्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. भारताच्या ताफ्यात जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी हे तीन जलदगती गोलंदाज खेळणे हे निश्चित आहे. फिरकीपटू म्हणून आर अश्विन, रवींद्र जडेजा व वरुण चक्रवर्थी यांच्यापैकी दोघं नक्की खेळतील. पण, हार्दिक अनफिट असल्यानं सहावा गोलंदाज कोण असेल, हे अजूनही गुलदस्त्यात आहे.
मात्र, शनिवारच्या दुसऱ्या सराव सत्रात मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) यानं गोलंदाजीवर हात साफ केले. नेट्समध्ये तो विराटला गोलंदाजी करताना दिसला आणि आजच्या सामन्यात सूर्यकुमारवर दुहेरी जबाबदारी सोपवली जाईल, अशी शक्यता निर्माण झाली आहे.
पाहा व्हिडीओ..