ICC T20 World Cup 2021 India vs Pakistan Scoreacard Live updates: टीम इंडियाला आजच्या सामन्यात अपेक्षित सुरुवात करता आली नाही. शाहिन शाह आफ्रिदीनं ( Shaheen Afridi) पाकिस्तानला मोठं यश मिळवून देताना टीम इंडियाच्या दोन्ही सलामीवीरांना झटपट माघारी पाठवलं. सूर्यकुमार यादव चांगल्या फॉर्मात दिसत होता, परंतु हसन अलीनं त्याची विकेट घेतली. यष्टिरक्षक मोहम्मद रिझवान ( Mohammad Rizwan) यानं अफलातून झेल घेतला. पण, या विकेटपूर्वी अम्पायरनं एक निर्णय बदलला अन् त्यावरून विराट नाराज झाला. India lose three wickets in powerplay ( संपूर्ण धावफलक पाहण्यासाठी क्लिक करा)
रोहित शर्मा ( Rohit Sharma) व लोकेश राहुल ( KL Rahul) यांनी डावाची सुरुवात केली. पण, भारताला पहिल्याच षटकात धक्का दिला. शाहिन शाह आफ्रिदी ( Shaheen Afridi ) यानं पहिल्याच षटकात टीम इंडियाला मोठा धक्का दिला. लोकेशनं तिसऱ्या चेंडूवर एक धाव घेत रोहितला स्ट्राईक दिली. पण, शाहिनच्या भेदक व आता येणाऱ्या चेंडूनं त्याची विकेट घेतली. रोहितला काही समजण्यापूर्वीच शाहिननं टाकलेला चेंडू रोहितच्या पायावर आदळला अन् LBW ची जोरदार अपील झाली. अम्पायरनंही लगेच हात वर केला व रोहित गोल्डन डकवर बाद झाला. T20 World Cup 2021, T20 World Cup 2021 matches,
२०१६नंतर प्रथमच रोहित ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये गोल्डन डकवर बाद झाला. यापूर्वी २०१२मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध व २०१६मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गोल्डन डकवर तो बाद झाला होता. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये रोहित सर्वाधिक ७वेळा शून्यावर बाद झाला आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत गोल्डन डकवर बाद होणारा तो पाचवा भारतीय खेळाडू ठरला. दिनेश कार्तिक ( २००७), मुरली विजय ( २०१०), आशिष नेहरा ( २०१०) व सुरेश रैना ( २०१६) हे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत शुन्यावर बाद झाले होते. World Cup 2021 live updates, T20 World Cup 2021 schedule
भारताचे दोन्ही सलामीवीर ६ धावांवर माघारी परतल्यानंतर कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) आणि सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) यांनी सुरुवातीला सावध खेळ करताना डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोन्ही फलंदाज तणावात दिसत होते. त्यातही ते डाव सावरण्यासाठी प्रयत्नशील होते, परंतु सहाव्या षटकात हसन अली गोलंदाजीला आला अन् त्यानं ही जोडी तोडली. World Cup 2021 live matches, Ind vs Pak live match
हसनच्या त्या षटकात विराटनं दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली. मैदानावरील अम्पायरनं सुरुवातीला No-Ball असल्याचा इशारा दिला, पण तोही काहीसा संभ्रमात दिसला अन् त्यानं निर्णय मागे घेतला. हसन अलीलाही कळेना की पुढील चेंडू Free Hit आहे की नाही. अम्पायरशी बोलून त्यानं त्याचा डाऊट क्लिअर केला. पण, अम्पायरच्या या निर्णयावर विराट कोहली नाखुश दिसला. चौथ्या चेंडूवर सूर्यकुमार ( ११) बाद झाला ( A bit of confusion out there, the umpire seemed to have signaled a no-ball but has apparently pulled back from his decision. Virat Kohli is not impressed )