नवी दिल्ली: टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे संघ भिडणार आहेत. त्यामुळे क्रिकेट रसिकांना मेजवानी मिळणार आहे. भारत आणि पाकिस्तानचे संघ २४ ऑक्टोबरला आमनेसामने उभे ठाकतील. बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील टक्कर क्रिकेट चाहत्यांना पाहता येईल. गेल्याच महिन्यात आयसीसीनं स्पर्धेसाठीचे गट जाहीर केले. ओमान आणि यूएईमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत १६ संघ सहभागी होतील.
एएनआय वृत्तसंस्थेनं सुत्रांच्या हवाल्यानं भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. भारत-पाकिस्तानचे संघ २४ ऑक्टोबरला आमनेसामने उभे ठाकतील. टी-२० विश्वचषक स्पर्धेचं वेळापत्रक आयसीसी याच आठवड्यात जाहीर करेल. भारत आणि पाकिस्तानचे संघ केवळ आयसीसीकडून आयोजित करणाऱ्या स्पर्धांमध्येच एकमेकांविरुद्ध खेळतात. त्यामुळेच क्रिकेट रसिक या स्पर्धांकडे डोळे लावून बसतात.
स्पर्धेचा फॉरमॅट काय?
स्पर्धेत एकूण सोळा संघांचा सहभाग आहे. आयसीसी क्रमवारीत पहिल्या आठ स्थानांवर असलेले देश थेट पात्र ठरले आहेत. तर इतर आठ संघांना पात्रता फेरीचा अडथळा पार करून मुख्य स्पर्धेत सहभागी व्हावं लागेल. या आठ संघांमध्ये बांग्लादेश, श्रीलंका, आयरलँड, नीदरलँड, स्कॉटलँड, नामिबिया, ओमान आणि पापुआ न्यू गिनीचा समावेश आहे. या आठपैकी चार संघ मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरतील.
आईसीसी टी-20 वर्ल्ड कप गट
पहिली फेरी
अ गट: श्रीलंका, आयरलँड, नीदरलँड, नामिबिया
ब गट: बांग्लादेश, स्कॉटलँड, पापुआ न्यू गिनी, ओमान
सुपर 12
गट 1: ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्टइंडिज, ए1, बी2
गट 2: भारत, पाकिस्तान, न्यूझीलँड, अफगाणिस्तान, बी1, ए2.
Web Title: ICC T20 World Cup 2021 India To Face Pakistan On October 24 in Dubai
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.