Join us  

ICC T20 World Cup 2021: माशी शिंकली!, वर्ल्ड कपला सुरुवात होण्याआधीच टीम इंडियाचा खेळाडू जखमी; कोणाला मिळणार संधी?

ICC T20 World Cup 2021: टीम इंडिया ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पहिला सामना २४ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2021 4:43 PM

Open in App

ICC T20 World Cup 2021: टीम इंडिया ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पहिला सामना २४ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. १७ ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेपूर्वी टीम इंडियाची डोकेदुखी वाढवणारी बातमी समोर आली आहे. कोलकाता नाइट रायडर्सचा ( KKR) मिस्ट्री फिरकीपटू वरुण चक्रवर्थी ( Varun Chakravarthy) याच्या गुडघ्याची दुखापत अद्याप पूर्णपणे बरी झालेली नाही आणि दुखापतीनं पुन्हा डोकं वर काढलं आहे.

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय संघात वरुणचा समावेश आहे आणि तो प्रमुख अस्त्र असेल, असे मानले जात आहे. पण, बीसीसीआयच्या वैद्यकिय टीमला तामिळनाडूच्या गोलंदाजाच्या तंदुरुस्तीसाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे. त्याचा गुडघा अजूनही बरा झालेला नाही. बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की, वरुणच्या गुडघ्याची अवस्था काही ठिक नाही. त्याला वेदना होत आहेत. पण, जर हा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप नसता तर भारतीय व्यवस्थापकांनी त्याला खेळवण्याची जोखीम कधीच घेतली नसती. सध्याच्या घडीला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेऊन त्याला वेदनेतून बाहेर काढण्याचे लक्ष्य आहे. त्यानंतर त्याच्या पुनर्वसनाचा विचार केला जाईल.''

''कोलकाताच्या सपोर्ट स्टाफनं वरुणच्या फिटनेससाठी वेगळा कार्यक्रम तयार केला आहे. त्याला वेदनानाशक इंजेक्शनही दिली जात आहेत. या इंजेक्शनमुळे त्याला वेदनेची जाण होत नाही. पण, तो जेव्हा गोलंदाजी करत नसतो, तेव्हा त्याला वेदना जाणवतात,''असेही सूत्रांनी सांगितले.

आयपीएल २०२१त वरूणनं १३ सामन्यांत १५ विकेट्स घेतल्या आहेत. त्यानं भारताकडूनही तीन ट्वेंटी-२० सामन्यांत दोन विकेट्स घेतल्या आहेत. वरूण पूर्णपणे तंदुस्त न झाल्यास बीसीसीआय त्याच्याजागी युझवेंद्र चहलच्या नावाचा विचार करू शकते. सर्व संघांना १० ऑक्टोबरपर्यंत त्यांच्या संघात बदल करता येणार आहेत. 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१भारतीय क्रिकेट संघकोलकाता नाईट रायडर्स
Open in App