ICC T20 World Cup 2021 Afghanistan vs Pakistan Scoreacard Live updates : अफगाणिस्तानच्या ६ बाद १४७ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरूवात साजेशी झाली नाही. मोहम्मद रिझवाद ८ धावांवर बाद झाल्यानंतर कर्णधार बाबर आजम आणि फाखर जमान यांनी पाकिस्तानचा डाव सावरला. मुजीब उर रहमाननं अफगाणिस्तानला पहिले यश मिळवून दिले. १२ धावांवर पहिली विकेट पडूनही बाबर ( Babar Azam) खेळपट्टीवर अडून बसला. त्यानं या सामन्यात दमदार खेळी करताना वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली. बाबरनं आजच्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याचा मोठा विक्रम मोडला.
अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हझरतुल्लाह झझाई व मोहम्मद शाहजाद फलंदाजीला मैदानावर उतरले अन् शाहिन आफ्रिदी गोलंदाजीवर होता. शाहिननं पहिल्याच षटकात DRS वाया घालवला. पण, हझरतुल्लाह झझाई ( ०) व मोहम्मद शाबजाज ( ८) यांना अुक्रमने इमाद वासीम व शाहिन यांनी बाद केले. त्यानंतर टप्प्याटप्पानं अफगाणिस्तानच्या विकेट्स पडतच होत्या. पण, त्यांचा प्रत्येक फलंदाज आक्रमक पवित्र्यातच होता. रहमनुल्लाह गुर्बाज ( १०) व अस्घर अफघान ( १०) हेही आक्रमक खेळण्याच्या प्रयत्नात विकेट गमावून बसले. करीन जनत ( १५) हा बाद झाल्यानंतर अफगाणिस्तानची अवस्था ५ बाद ६४ अशी झाली.
नजिबुल्लाह झाद्रान व कर्णधार मोहम्मद नबी यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु २२ धावांवर झाद्रान बाद झाला. आता सामना आपल्या हातात असेच पाकिस्तानला वाटत होते, परंतु नबी व गुलबदीन नैब या जोडीनं पाकिस्तानी गोलंदाजांना धु धु धुतले. या दोघांनी ३३ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी करताना अफगाणिस्तानला सन्मानजक धावसंख्या उभी करून दिली. इमाद वासीमनं २५ धावांत २ विकेट्स घेतल्या. हसन अलीनं टाकलेल्या १८व्या षटकात गुलबदीननं २१ धावा कुटल्या. नबी ३५ आणि नैब ३५ धावांवर नाबाद राहिले. या जोडीनं अखेरच्या पाच षटकांत धावांचा पाऊस पाडला आणि संघाला ६ बाद १४७ धावा उभ्या करून दिल्या.
बाबर व जमान यांनी पाकिस्तानला ११ षटकांत १ बाद ७५ धावांपर्यंत मजल मारून दिली आहे. या सामन्यात बाबरनं ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वात जलद १००० धावा करण्याचा विक्रम केला. बाबरनं २६ डावांमध्ये हा पराक्रम केला आणि यासह त्यानं विराटचा ३० डावांमध्ये हा विक्रम नोंदवण्याचा विक्रम मोडला. त्यानंतर फॅफ ड्यू प्लेसिस ( ३१ डाव) व अॅरोन फिंच ( ३२ डाव ) यांचा क्रमांक येतो.
Web Title: ICC T20 World Cup 2021 PAK vs AFG Live updates : Another Virat Kohli record broken by Babar Azam, He is now the fastest to 1000 T20I runs as captain
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.