ICC T20 World Cup 2021 Afghanistan vs Pakistan Scoreacard Live updates : भारत व न्यूझीलंड या तगड्या संघांना पराभूत केल्यानंतर अफगाणिस्तानला कमी लेखणाऱ्या पाकिस्तानला चांगल उत्तर मिळालं. दुबईच्या इंटरनॅशनल स्टेडियमवर अफगाणिस्तानच्या पाठीराख्यांची संख्या अधिक होती आणि म्हणून त्यांच्या प्रत्येक धावांवर एकच कल्ला होताना दिसला. मोहम्मद नबी व गुलबदीन नैब या जोडीनं पाकिस्तानच्या गोलंदाजांची अखेरच्या षटकांत सॉलिड धुलाई केली. त्याजोरावर ६ बाद ७६ धावांवरून अफगाणिस्ताननं मोठी मजल मारली
अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हझरतुल्लाह झझाई व मोहम्मद शाहजाद फलंदाजीला मैदानावर उतरले अन् शाहिन आफ्रिदी गोलंदाजीवर होता. शाहिननं पहिल्याच षटकात DRS वाया घालवला. पण, हझरतुल्लाह झझाई ( ०) व मोहम्मद शाबजाज ( ८) यांना अुक्रमने इमाद वासीम व शाहिन यांनी बाद केले. त्यानंतर टप्प्याटप्पानं अफगाणिस्तानच्या विकेट्स पडतच होत्या. पण, त्यांचा प्रत्येक फलंदाज आक्रमक पवित्र्यातच होता. रहमनुल्लाह गुर्बाज ( १०) व अस्घर अफघान ( १०) हेही आक्रमक खेळण्याच्या प्रयत्नात विकेट गमावून बसले. करीन जनत ( १५) हा बाद झाल्यानंतर अफगाणिस्तानची अवस्था ५ बाद ६४ अशी झाली.
नजिबुल्लाह झाद्रान व कर्णधार मोहम्मद नबी यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु २२ धावांवर झाद्रान बाद झाला. आता सामना आपल्या हातात असेच पाकिस्तानला वाटत होते, परंतु नबी व गुलबदीन नैब या जोडीनं पाकिस्तानी गोलंदाजांना धु धु धुतले. या दोघांनी ३३ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी करताना अफगाणिस्तानला सन्मानजक धावसंख्या उभी करून दिली. इमाद वासीमनं २५ धावांत २ विकेट्स घेतल्या. हसन अलीनं टाकलेल्या १८व्या षटकात गुलबदीननं २१ धावा कुटल्या. नबी ३५ आणि नैब ३५ धावांवर नाबाद राहिले. या जोडीनं अखेरच्या पाच षटकांत धावांचा पाऊस पाडला आणि संघाला ६ बाद १४७ धावा उभ्या करून दिल्या.
ट्वेंटी- वर्ल्ड कप स्पर्धेतील ७ व्या विकेटसाठी सर्वोत्तम भागीदारी
74 - Hussey & Smith v BAN, 2010
68* - Gulbadin & Nabi v PAK, 2021
68* - Mathews & Sangakkara v PAK, 2009
68 - Bailey & Cummins v WI, 2012
54* - Brathwaite & Samuels v ENG, 2016
Web Title: ICC T20 World Cup 2021 PAK vs AFG Live updates : great fightback by Afghanistan - 76 for 6 in the 13th over and finishing on 147 for 6, Hasan Ali's give 21 runs in one over
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.