Join us  

T20 World Cup 2021 PAK vs AFG  Live Score: 6,0,6,0,6,6; आसिफ अलीनं वाट लावली, अफगाणिस्तानच्या हातची मॅच पाकिस्तानसाठी खेचून आणली

Pakistan won by 5 wickets : सलग तिसऱ्या विजयासह पाकिस्ताननं उपांत्य फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित केला आहे. आता उर्वरित सामन्यांत त्यांच्यासमोर नामिबिया व स्कॉटलंडचे आव्हान आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 11:11 PM

Open in App

ICC T20 World Cup 2021 Afghanistan vs Pakistan Scoreacard Live updates : अफगाणिस्तान आणि सेमी फायनल यांच्या मार्गात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) उभा राहिला. अफगाणिस्ताननं ठेवलेल्या १४८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. पण, बाबर व फाखर जमान यांनी डाव सावरला. राशिद खाननं उत्तम गोलंदाजी करून सामना अटीतटीचा बनवला, परंतु पुन्हा एकदा आसिफ अली ( Asif Ali) पाकिस्तानसाठी धावला. त्यानं एकाच षटकात ४ षटकार खेचून पाकिस्तानला सलग तिसरा विजय मिळवून दिला.

अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हझरतुल्लाह झझाई ( ०) व मोहम्मद शाबजाज ( ८) यांना अुक्रमने इमाद वासीम व शाहिन यांनी बाद केले. त्यानंतर टप्प्याटप्पानं अफगाणिस्तानच्या विकेट्स पडतच होत्या. पण, त्यांचा प्रत्येक फलंदाज आक्रमक पवित्र्यातच होता. रहमनुल्लाह गुर्बाज ( १०) व अस्घर अफघान ( १०) हेही आक्रमक खेळण्याच्या प्रयत्नात विकेट गमावून बसले. करीन जनत ( १५) हा बाद झाल्यानंतर अफगाणिस्तानची अवस्था ६ बाद ७६ अशी झाली होती. नजिबुल्लाह झाद्रान व कर्णधार मोहम्मद नबी यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु २२ धावांवर झाद्रान बाद झाला. नबी व गुलबदीन नैब या जोडीनं अफगाणिस्तानला सन्मानजक धावसंख्या उभी करून दिली. नबी ३५  आणि नैब ३५ धावांवर नाबाद राहिले. या जोडीनं अखेरच्या पाच षटकांत धावांचा पाऊस पाडला आणि संघाला ६ बाद १४७ धावा उभ्या करून दिल्या. 

पाकिस्तानची सुरूवात साजेशी झाली नाही. मोहम्मद रिझवाद ८ धावांवर बाद झाल्यानंतर कर्णधार बाबर आजम आणि फाखर जमान यांनी पाकिस्तानचा डाव सावरला. मुजीब उर रहमाननं अफगाणिस्तानला पहिले यश मिळवून दिले. १२ धावांवर पहिली विकेट पडूनही बाबर ( Babar Azam) खेळपट्टीवर अडून बसला. बाबर व जमान यांनी पाकिस्तानला ११ षटकांत १ बाद ७५ धावांपर्यंत मजल मारून दिली आहे. राशीद खानच्या गोलंदाजीवर DRSमुळे जीवदान मिळालेल्या बाबरनं अर्धशतकी खेळी केली. पण, फाखर २५ चेंडूंत ३० धावांवर बाद झाला. मोहम्मद हाफिज ( १०) पुन्हा अपयशी ठरला. 

१७व्या षटकात राशिदच्या गोलंदाजीवर बाबरला जीवदान मिळालं, नवीननं त्याचा झेल सोडला. पण, त्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर राशिदनं त्रिफळा उडवत ५१ धावा करणाऱ्या बाबरला माघारी पाठवलं. पुढच्याच षटकात नवीन-उल-हकनं सोडलेल्या झेलची वसूली केली आणि शोएब मलिकची ( १९) महत्त्वाची विकेट घेतली. पाकिस्तानला १२ चेंडूंत २४ धावांची गरज होती आणि आसिफ फलीनं १९व्या षटकात करीम जनतला चार खणखणीत षटकार खेचून सर्व दडपण झुगारून लावलं आणि पाकिस्तानला ५ विकेट्स व ६ चेंडू राखून जिंकवलं. आसिफनं ७ चेंडूंत २५ धावा केल्या. 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१अफगाणिस्तानपाकिस्तानबाबर आजम
Open in App