Join us  

T20 World Cup 2021 PAK vs AFG  Live Score: शाहिन आफ्रिदीला वाटत होतं प्रत्येक चेंडूवर मिळतेय विकेट, पण त्याचा हा हट्ट पाकिस्तानलाच पडला महागात 

ICC T20 World Cup 2021 Afghanistan vs Pakistan Scoreacard Live updates : टीम इंडियापाठोपाठ न्यूझीलंडला नमवल्यानंतर पाकिस्तानसमोर आज अफगाणिस्तानचे आव्हान आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 8:03 PM

Open in App

ICC T20 World Cup 2021 Afghanistan vs Pakistan Scoreacard Live updates : टीम इंडियापाठोपाठ न्यूझीलंडला नमवल्यानंतर पाकिस्तानसमोर आज अफगाणिस्तानचे आव्हान आहे. दुबईच्या इंटरनॅशनल स्टेडियमवर अफगाणिस्तानचेच पाठिराखे अधिक दिसत आहेत. तरीही दोन तगड्या संघाना नमवल्यानंतर अफगाणिस्तान आपल्यासमोर काय चीज, याच आविर्भावात पाकिस्तानचा संघ मैदानावर उतरला अन् पहिल्याच षटकात तोंडावर आपटला. शाहिन शाह आफ्रिदीनं ( Shaheen Afridi) टीम इंडियाविरुद्ध पहिल्याच षटकात जो करिष्मा दाखवला, त्याचीच पुनरावृत्ती अफगाणिस्ताविरुद्ध करण्याचा त्याचा प्रयत्न दिसला. पण, त्याच्या हट्टापायी पाकिस्तानला पहिल्याच षटकात फटका बसला.  ( संपूर्ण धावफलक एका क्लिकवर

अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हझरतुल्लाह झझाई व मोहम्मद शाहजाद फलंदाजीला मैदानावर उतरले अन् शाहिन आफ्रिदी गोलंदाजीवर होता. पहिलाच चेंडू Wide टाकल्यानंतर पुढच्या चेंडूवर हझरतुल्लाच्या पायावर चेंडू आदळला व शाहिन अपील केली. अम्पायरनं लेग बाय दिल्यानंतर शाहिन DRS साठी हट्ट धरू लागला. पण, यष्टिरक्षक मोहम्मद रिझवाननं कर्णधार बाबर आजमला चेंडू बाहेर जात असल्याचा इशारा केला. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर शाहजादनं पुढे येऊन फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू व बॅट यांच्यात कनेक्शन झाले नाही. तेव्हाही शाहीन DRS घे असे सांगत होता.

सहाव्या चेंडूवर पुन्हा हझरतुल्लाच्या पॅडवर चेंडू आदळला अन् आता तर शाहिन ठाम होता. पण, तो चेंडू पाचव्या स्टम्प्सवर आदळत असल्याचे रिप्लेत दिसले आणि पाकिस्तानचा DRS वाया गेला. यानंतर सोशल मीडियावर शाहिनची टिंगल उडवली गेली. पण फजिती इथेच थांबली नाही... T20 World Cup 2021, T20 World Cup 2021 matches, T20 World Cup 2021 live updates शाहिन व इमाद वासीम यांनी अफगाणिस्तानचे सलामीवीर माघारी पाठवले, परंतु असघर अफघान यानं फटकेबाजी केली. चौथ्या षटकात रहमनुल्लाह गुर्बाजला धावबाद करण्याची सोपी संधी रिझवाननं गमावली. 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१पाकिस्तानअफगाणिस्तान
Open in App