Join us  

T20 World Cup 2021 PAK vs NZ Live Score: पाकिस्ताननं न्यूझीलंडलाही लोळवलं, या निकालानं टीम इंडियालाही सावरलं 

ICC T20 World Cup 2021 Pakistan Vs New Zealand Scoreacard Live updates : पाकिस्तान संघानं पुन्हा एकदा गोलंदाजांच्या जोरावर ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत विजय मिळवला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 11:02 PM

Open in App

ICC T20 World Cup 2021 Pakistan Vs New Zealand Scoreacard Live updates : पाकिस्तान संघानं पुन्हा एकदा गोलंदाजांच्या जोरावर ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत विजय मिळवला. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात हॅरीस रौफनं सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. पाकिस्तानच्या फलंदाजांची कामगिरी आज चांगली झाली नाही, परंतु अनुभवी शोएब मलिक ( Shoaib Malik) व आसिफ अली ( Asif Ali) यांनी सहाव्या विकेटसाठी दमदार भागीदारी करून पाकिस्तानला ५ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. पाकिस्तानच्या या विजयानं टीम इंडियाला दिलासा मिळाला. 

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) यानं नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. शाहजाच्या खेळपट्टीवर न्यूझीलंडच्या फलंदाजांचा कस लागणार हे निश्चित होते. त्यामुळेच मार्टिन गुप्तील व डॅरील मिचेल या जोडीनं सावध खेळ केला. पाकिस्तानी गोलंदाजांनीही टिच्चून मारा करताना किवींच्या धावांचा ओघ रोखला. न्यूझीलंडला ८ बाद १३४ धावा करता आल्या. मिचेल ( २७), केन विलियम्सन ( २५), डेव्हॉन कॉनवे ( २७) यांची झुंज दाखवली. शाहिन शाह आफ्रिदी ( १-२१), इमाद वासीम  ( १- २४) आणि मोहम्मद हाफिज ( १-१६) यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. रौफनं २२ धावांत ४ विकेट्स घेतल्या. T20 World Cup 2021 live updates, T20 World Cup 2021 schedule,  T20 World Cup 2021 live matches

बाबार आजम व मोहम्मद रिझवान ही जोडीच पाकिस्तानला विजय मिळवून देईल, असे वाटत होते. पण, आज बाबर अपयशी ठरला. टीम साऊदीनं त्याचा ( ९) त्रिफळा उडवला. फाखर जमाननं आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न केला, परंतु इश सोढीनं चतुराईनं त्याला बाद केले. मैदानावरील पंचांनी LBWच्या अपीलवर नाबाद निर्णय देताच केननं DRS घेतला अन् त्यांना हे यश मिळालं. पाकिस्तानला १० षटकांत ५८ धावा करता आल्या होत्या आणि हा त्यांच्यासाठी चिंतेचा विषय होता. अनुभवी मोहम्मद हाफिजनं पहिल्याच चेंडूवर षटकार खेचून इरादा स्पष्ट केला, परंतु मिचेल सँटनरनं त्याला ११ धावांवर बाद करून पाकिस्तानला तिसरा धक्का दिला. T20 World Cup 2021, T20 World Cup 2021 matches रिझवान खेळपट्टीवर असल्यामुळे किवींची चिंता कायम होती. इश सोढीनं ही चिंता दूर केली. १२व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर रिझवाननं चौकार खेचला, मात्र सोढीनं पुढच्याच चेंडूवर रिझवानला पायचीत करून पाकिस्तानला मोठा धक्का दिला. रिझवान ३३ धावांवर माघारी परतला. पाकिस्तानचा निम्मा संघ ८७ धावांवर माघारी परतल्यानंतर अनुभवी शोएब मलिकनं ( Shoaib Malik) खिंड लढवली. आसिफ अलीनं टीम साऊदीला सलग दोन षटकार खेचून पाकिस्तानवरील दडपण हलकं केलं. पाकिस्तानला अखेरच्या १८ चेंडूंत २४ धावांची गरज होती. १८व्या षटकातील पहिल्या तीन चेंडूवर शोएबनं १२ धावा चोपल्या. मलिक २० चेंडूंत २७, तर आसिफ १२ चेंडूंत २७ धावांवर नाबाद राहिला. पाकिस्ताननं १८.४ षटकांत ५ बाद १३५ धावा करून विजय पक्का केला.  

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१भारत विरुद्ध पाकिस्तानशोएब मलिक
Open in App