Join us  

ICC T20 World Cup 2021, PAK vs SCO, Live: बाबर आझम, शोएब मलिकचा धडाका! पाकचं स्कॉटलंडसमोर १९० धावांचं आव्हान

ICC T20 World Cup 2021, PAK vs SCO, Live: ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये दमदार फॉर्मात असलेल्या पाकिस्तानच्या संघानं साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यातही फॉर्म कायम राखत स्कॉटलंडसमोर विजयासाठी १९० धावांचा डोंगर उभारला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2021 9:15 PM

Open in App

ICC T20 World Cup 2021, PAK vs SCO, Live: ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये दमदार फॉर्मात असलेल्या पाकिस्तानच्या संघानं साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यातही फॉर्म कायम राखत स्कॉटलंडसमोर विजयासाठी १९० धावांचा डोंगर उभारला आहे. पाकिस्तानचं कर्णधार बाबर आझम आणि अनुभव शोएब मलिकनं तुफान फटकेबाजी करत स्कॉटलंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. शोएब मलिकनं अखेरच्या षटकांमध्ये चौकार आणि षटकारांची आतषबाजी करत अवघ्या १८ चेंडूत नाबाद ५४ धावा केल्या. तर बाबर आझमनं ४७ चेंडूत ६६ धावांची खेळी भक्कम पाया रचला. बाबर आझमनं ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये गेल्या पाच सामन्यांमध्ये चौथ्यांदा अर्धशतकी साकारली आहे.  

सामन्याची नाणेफेक जिंकून पाकिस्ताननं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मोहम्मद रिझवान यावेळी १५ धावांवर बाद झाला. पण कर्णधार बाबर आझमनं सातत्यपूर्ण खेळीचं दर्शन घडवत याही सामन्यात अर्धशतकी खेळी साकारली. ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये चार अर्धशतकं ठोकण्याच्या कोहलीच्या विक्रमाची बाबर आझमनं आज बरोबरी केली आहे. फाकर झमान (८) स्वस्तात बाद झाला. मोहम्मद हाफिजनं १९ चेंडूत ३१ धावा केल्या. अखेरीस शोएब मलिकनं आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करत संघासाठी मोलाचं योगदान दिलं. अवघ्या १८ चेंडूत मलिकनं ५४ धावांची खेळी साकारली. यात मलिकनं ६ खणखणीत षटकार ठोकले. 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१पाकिस्तान
Open in App