ICC T20 World Cup 2021 South Africa Vs West Indies Scoreacard Live updates : वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या सामन्यात विंडीज प्रथम फलंदाजीला आले आहेत. संथ सुरुवातीनंतर वेस्ट इंडिजच्या सलामीवीरांनी फटकेबाजी सुरू केली आहे. पण, या सामन्यातून एका नव्या वादाला सुरुवात झाली आहे. Quinton de Kock नं या सामन्यात वैयक्तिक कारणास्तव न खेळण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमा यानं सामन्यापूर्वी ही माहिती दिली अन् सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. पण, हे प्रकरण इथेच थांबलेलं नाही, क्विंटन डी कॉकच्या या सामन्यात न खेळण्यामागचं जेव्हा खरं कारण समोर आलं, तेव्हा या धक्क्याची तीव्रता आणखी वाढली.
या सामन्यापूर्वी क्रिकेट दक्षिण आफ्रिकेनं ( CSA) सर्व खेळाडूंना एक मेल पाठवला आणि त्यात त्यांनी स्पष्ट सूचना केल्या की ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील प्रत्येक लढतीपूर्वी खेळाडूंनी #BlackLiveMatter चळवळीला पाठींबा दर्शवताना गुडघ्यावर बसणे बंधनकारक आहे. याच मुद्यावर क्विंटननं विरोध दर्शवला आणि त्यानं खेळण्यास नकार दिला. भारतीय संघाचा यष्टिरक्षक दिनेश कार्तिक ( Dinesh Karthik) यानंही क्विंटनच्या वागण्यावर आश्चर्य व्यक्त केलं.
क्रिकेट दक्षिण आफ्रिकेनं काय म्हटलं?
सोमवारी सायंकाळी CSA नं खेळाडूंना मेल पाठवला आणि त्यांनी वर्ल्ड कप स्पर्धेतील प्रत्येक सामन्यापूर्वी गुडघ्यावर बसून “taking the knee” वर्णद्वेषी विरोधी मोहीमेला पाठींबा देण्याचे आदेश दिले. टीम इंडियानंही पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात BLM मोहीमेला पाठींबा देताना गुडघ्याव बसले होते. या स्पर्धेत सहभागी झालेले बरेचसे संघ असे करत आहेत आणि म्हणून दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनाही तसे आदेश देण्यात आले आहेत.
नेटिझन्समध्ये संमिश्र चर्चा
Web Title: ICC T20 World Cup 2021 SA vs WI Live updates : Quinton de Kock was dropped from the side against West Indies because he didn’t want to take a knee in support of the BLM movement
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.