T20 World Cup 2021 SA vs WI Live Score: वेस्ट इंडिजचा सलग दुसरा पराभव, दक्षिण आफ्रिकेचा मोठा विजय; गतविजेत्यांचे स्पर्धेतील आव्हान अडचणीत

ICC T20 World Cup 2021 South Africa Vs West Indies Scoreacard Live updates : गतविजेत्या वेस्ट इंडिजचे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान अडचणीत आले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 07:08 PM2021-10-26T19:08:26+5:302021-10-26T19:08:47+5:30

whatsapp join usJoin us
ICC T20 World Cup 2021 SA vs WI Live updates : South Africa beat West Indies by 8 wickets in Dubai | T20 World Cup 2021 SA vs WI Live Score: वेस्ट इंडिजचा सलग दुसरा पराभव, दक्षिण आफ्रिकेचा मोठा विजय; गतविजेत्यांचे स्पर्धेतील आव्हान अडचणीत

T20 World Cup 2021 SA vs WI Live Score: वेस्ट इंडिजचा सलग दुसरा पराभव, दक्षिण आफ्रिकेचा मोठा विजय; गतविजेत्यांचे स्पर्धेतील आव्हान अडचणीत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC T20 World Cup 2021 South Africa Vs West Indies Scoreacard Live updates : गतविजेत्या वेस्ट इंडिजचे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान अडचणीत आले आहे. वेस्ट इंडिजला मंगळवारी दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला. २०१६च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील विजेत्या विंडीजचा हा सलग दुसरा पराभव ठरला आहे. पहिल्या सामन्यात त्यांना इंग्लंडकडून मानहानिकारक पराभव पत्करावा लागला होता. दक्षिण आफ्रिकेनं ८ विकेट्स राखून आजचा सामना जिंकून ग्रुप १ मध्ये चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. विंडीज सहाव्या क्रमांकावर आहेत. 

नाणेफेक जिंकून आफ्रिकेनं विंडीजला प्रथम फलंदाजीसाठी बोलावलं.  वेस्ट इंडिजच्या सलामीवीरांनी चांगली कामगिरी केली. लुईस व सिमन्स यांनी पहिल्या तीन षटकांत अवघ्या ६ धावा केल्या होत्या, परंतु त्यानंतर त्यांनी तुफान फटकेबाजी केली. या दोघांची ७४ धावांची भागीदारी कागिसो रबाडानं संपुष्टात आणली. लुईस ३५ चेंडूंत ३ चौकार व ६ षटकार खेचून ५६ धावांवर माघारी परतला, केशव महाराजनं त्याची विकेट घेतली. त्यानंतर सिमन्स १६ धावांवर त्रिफळाचीत झाला अन् विंडीजचा डाव गडगडला. किरॉन पोलार्डनं २६ धावा केल्या. १८व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर ख्रिस गेल ( १२) माघारी परतला आणि त्यानंतर पुढील १५ चेंडूंत विंडीजचे पाच फलंदाज बाद झाले. विंडीजला २० षटकांत ८ बाद १४३ धावा करता आल्या. ड्वेन प्रेटॉरियसनं ३ व केशव महाराजनं २ विकेट्स घेतल्या. 

प्रत्युत्तरात कर्णधार टेम्बा बवुमा ( २) पहिल्याच षटकात धावबाद झाल्यानंतरही आफ्रिकेनं धीर खचू दिला नाही. रिझा हेन्ड्रीक्स व रॅसी व्हॅन डेर ड्युसेन यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी केली. हेन्ड्रीक्स ३० चेंडूंत ३९ धावांवर माघारी परतला. त्यानंतर डेर ड्युसेन व एडन मार्कराम यांनी अखेरपर्यंत खिंड लढवताना विंडीजच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. ड्युसेन ५१ चेंडूंत ४३ धावांवर, तर मार्कराम २६ चेंडूंत २  चौकार व ४ षटकारांच्या मदतीनं ५१ धावांवर नाबाद राहिला. आफ्रिकेनं १८.२ षटकांत २ बाद १४४ धावा करून विजय पक्का केला .
 

Web Title: ICC T20 World Cup 2021 SA vs WI Live updates : South Africa beat West Indies by 8 wickets in Dubai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.