ICC T20 World Cup 2021 South Africa Vs West Indies Scoreacard Live updates : पहिल्याच सामन्यात इंग्लंडविरुद्ध दारूण पराभव पत्करणारा वेस्ट इंडिजचा संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत कमबॅक करेल असे वाटत होते. एव्हिन लुईस आणि लेडंल सिमन्स यांनी चांगली सुरुवात करून दिल्यानंतरही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. वेस्ट इंडिजचे ५ फलंदाज अखेरच्या १५ चेंडूंत माघारी पाठवून दक्षिण आफ्रिकेनं सामन्यात जबरदस्त कमबॅक केले.
नाणेफेक जिंकून आफ्रिकेनं विंडीजला प्रथम फलंदाजीसाठी बोलावलं. आजच्या सामन्यातून क्विंटन डी कॉकनं माघार घेतल्यानं सर्वांच्या भूवया उंचावल्या होत्या. #Black Live Matter या मोहीमेसाठी गुडघ्यावर बसण्यास क्विंटन डी कॉकनं विरोध दर्शवून सामन्यातून माघार घेतली. आता क्रिकेट दक्षिण आफ्रिका (CSA) संघ व्यवस्थापनाचा अहवाल आल्यानंतर कारवाई करणार आहेत. दरम्यान, वेस्ट इंडिजच्या सलामीवीरांनी चांगली कामगिरी केली. लुईस व सिमन्स यांनी पहिल्या तीन षटकांत अवघ्या ६ धावा केल्या होत्या, परंतु त्यानंतर त्यांनी तुफान फटकेबाजी केली. या दोघांची ७४ धावांची भागीदारी कागिसो रबाडानं संपुष्टात आणली.
लुईस ३५ चेंडूंत ३ चौकार व ६ षटकार खेचून ५६ धावांवर माघारी परतला, केशव महाराजनं त्याची विकेट घेतली. त्यानंतर सिमन्स १६ धावांवर त्रिफळाचीत झाला अन् विंडीजचा डाव गडगडला. किरॉन पोलार्डनं २६ धावा केल्या. १८व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर ख्रिस गेल ( १२) माघारी परतला आणि त्यानंतर पुढील १५ चेंडूंत विंडीजचे पाच फलंदाज बाद झाले. विंडीजला २० षटकांत ८ बाद १४३ धावा करता आल्या. ड्वेन प्रेटॉरियसनं ३ व केशव महाराजनं २ विकेट्स घेतल्या.
Web Title: ICC T20 World Cup 2021 SA vs WI Live updates : West Indies end up with a total of 143/8, they lost 5 wickets in last 18 balls
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.