Join us  

T20 World Cup 2021 SL vs BAN Live Score: भर मैदानात राडा!; Liton Das आणि श्रीलंकेचा गोलंदाज लाहिरु कुमारा एकमेकांना भिडले, Video

ICC T20 World Cup 2021 Sri Lanka vs Bangladesh Scoreacard Live updates: भारत-पाकिस्तान सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचत असताना श्रीलंका-बांगलादेश सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 5:00 PM

Open in App

ICC T20 World Cup 2021 Sri Lanka vs Bangladesh Scoreacard Live updates: भारत-पाकिस्तान सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचत असताना श्रीलंका-बांगलादेश सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु शारजाहच्या खेळपट्टीवर बांगलादेशच्या फलंदाजांनी वादळ आणलं. लिटन दास ( Liton Das) व मोहम्मद नईम यांनी बांगलादेशला दमदार सुरुवात करून दिली. त्यामुळे श्रीलंकेचा गोलंदाज लाहिरु कुमारा ( Lahiru Kumara) याचा ताबा सुटला अन् भर मैदानात राडा झाला.

लिटन दास व मोहम्मद नईम यांनी सुरेख कामगिरी बजावताना संघाला पॉवरप्लेमध्ये ८च्या सरासरीनं धावा चोपून दिल्या. ६ व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर ही भागीदारी संपुष्टात आली, परंतु माघारी परतणाऱ्या लिटन दासला डिवचण्याची कुमारानं चुक केली. त्यानंतर मैदानावर जबरदस्त राडा पाहायला मिळाला आणि दोन्ही संघांच्या खेळाडूंसह अम्पायरनंही मध्यस्थी करता भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला. 

चौथ्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर मोहम्मद नईमनं स्ट्रेट फटका मारला अन् चेंडू गोलंदाज कुमारा याच्या हातातच गेला. नईम क्रिज सोडून पुढे आला होता आणि त्यामुळे कुमारानं चेंडू पुन्हा त्याच्या दिशेनं भिरकावला. नईम खाली वाकला नसता तर चेंडू त्याच्या हेल्मेटवर आदळला असला.  

पुढील षटकात म्हणजे ६व्या षटकात कुमाराच्या गोलंदाजीवर ड्राईव्ह मारताना लिटन दास झेलबाद झाला. तंबूत परत जाणाऱ्या लिटनकडे बघून कुमारा पुटपुटला आणि दोघंही खेळाडू एकमेकांच्या अंगावर धावले.  

पाहा व्हिडीओ...  दरम्यान नईमनं ५२ चेंडूंत ६२ धावा केल्या आणि लिटन १६ धावांवर माघारी परतला. शाकिब अल हसनही ( १०) अपयशी ठरला. मुश्फीकुर रहिम दमदार फटकेबाजी करत आहे आणि बांगलादेशनं १७ षटकांत १४० धावा केल्या आहेत. 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१श्रीलंकाबांगलादेश
Open in App