ICC T20 World Cup 2021 Sri Lanka vs Bangladesh Scoreacard Live updates: भारत-पाकिस्तान सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचत असताना श्रीलंका-बांगलादेश सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु शारजाहच्या खेळपट्टीवर बांगलादेशच्या फलंदाजांनी वादळ आणलं. मोहम्मद नईम ( Mohammad Naim) व मुस्फीकर रहिम ( Mushfiqur Rahim) यांनी चेंडू उत्तुंग टोलवले.
लिटन दास व मोहम्मद नईम यांनी सुरेख कामगिरी बजावताना संघाला पॉवरप्लेमध्ये ८च्या सरासरीनं धावा चोपून दिल्या. ६ व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर ही भागीदारी संपुष्टात आली, परंतु माघारी परतणाऱ्या लिटन दासला डिवचण्याची कुमारानं चुक केली. त्यानंतर मैदानावर जबरदस्त राडा पाहायला मिळाला आणि दोन्ही संघांच्या खेळाडूंसह अम्पायरनंही मध्यस्थी करता भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला.
नेमकं काय घडलं?
पुढील षटकात म्हणजे ६व्या षटकात कुमारच्या गोलंदाजीवर ड्राईव्ह मारताना लिटन दास झेलबाद झाला. तंबूत परत जाणाऱ्या लिटनकडे बघून कुमार पुटपुटला आणि दोघंही खेळाडू एकमेकांच्या अंगावर धावले.
नईमनं ५२ चेंडूंत ६२ धावा केल्या आणि लिटन १६ धावांवर माघारी परतला. शाकिब अल हसनही ( १०) अपयशी ठरला. मुश्फीकुर रहिम दमदार फटकेबाजी केली. रहिमनं ३२ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. कुमारानं ३० धावांत १, बिनुरा फर्नांडोनं २७ धावांत १, चमिका करुणारत्नेनं १२ धावांत १ विकेट घेतली. रहिम ३७ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ५७ धावांवर नाबाद राहिला, तर महमुदुल्लाहनं नाबाद १० धावा केल्या. बांगलादेशनं ४ बाद १७१ धावांचा डोंगर उभा केला.
Web Title: ICC T20 World Cup 2021 SL vs BAN Live updates : Sri Lanka will need 172 runs for a victory, Mohammad Naim & & Mushfiqur Rahim smashed half century
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.