ICC T20 World Cup 2021, West Indies vs Australia, Live Updates: ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात अबू धाबीच्या स्टेडियममध्ये सामना होत आहे. स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्यासाठीचं वेस्ट इंडिजचं आव्हान संपुष्टात आलं असलं तरी ऑस्ट्रेलियाला आजचा सामना जिंकून 'अ' गटात पहिलं स्थान प्राप्त करण्याची संधी असणार आहे. सामान्याची नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियानं आजचा सामना जिंकला तर दक्षिण आफ्रिकेचं आव्हानही संपुष्टात येणार आहे. द. आफ्रिका सध्या गुणतालिकात ६ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर वेस्ट इंडिज २ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.
वेस्ट इंडिजचं उपांत्य फेरीतील आव्हान संपुष्टात आलेलं असलं तरी संघानं आजचा सामना गमावला तर संघाच्या आयसीसी ट्वेन्टी-२० क्रमवारीतमध्ये खूप मोठा फरक पडणार आहे. वेस्ट इंडिजला आज पराभवाला सामोरं जावं लागल्यात संघ आयसीसी क्रमवारीत ९ व्या स्थानावर पोहोचणार आहे. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्डकप स्पर्धेसाठी संघाला क्वालिफिकेशन राऊंडमध्ये खेळून पात्रता सिद्ध करण्याची नामुष्की ओढावू शकते.
Web Title: ICC T20 World Cup 2021 West Indies vs Australia Live updates Australia win the toss and decide to bowl
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.