Join us  

T20 World Cup 2024 IND vs IRE Live Match : आम्ही भारतीय सर्वत्र आहोत, आम्ही जगावर राज्य करतो! हार्दिक पांड्याच्या विधानाची चर्चा 

युझवेंद्र चहल व कुलदीप यादव या फॉर्मात असलेल्या फिरकी जोडीला प्लेइंग इलेव्हन बाहेर ठेवल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2024 9:48 PM

Open in App

ICC T20 World Cup 2024 IND vs IRE Live Scorecard - भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेची सुरुवात दणक्यात केली. युझवेंद्र चहल व कुलदीप यादव या फॉर्मात असलेल्या फिरकी जोडीला प्लेइंग इलेव्हन बाहेर ठेवल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. पण, रोहित शर्माचा ४ जलदगती गोलंदाज खेळवण्याचा निर्णय योग्य ठरला. हार्दिक पांड्याने आज कमाल करून दाखवताना ३ विकेट्स घेतल्या आणि अमेरिकेत भारतीय संघासाठी जमलेल्या गर्दीला पाहून मोठं विधान केलं. 

भारतीय गोलंदाजांनी कमाल करून दाखवताना आयर्लंडचा संपूर्ण संघ १६ षटकांत ९६ धावांत तंबूत पाठवला. अर्शदीप सिंगने भारी सुरुवात करून दिली. मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह यांनी तिखट मारा करून आयर्लंडच्या फलंदाजांना दडपणाखाली आणले. त्याचे फायदा उचलताना हार्दिक पांड्याने ३ धक्के दिले. अर्शदीपने पहिल्या स्पेलमध्ये ३-०-१८-२ असा मारा केला. हार्दिकने ४-१-२७-३ अशी अप्रतिम स्पेल टाकली.  आयर्लंडचे शेपूट गुंडाळण्याचा विडा जसप्रीतने उचलला आणि जोश लिटल ( १४) याचा अप्रतिम यॉर्कवर त्रिफळा उडवून संघाला नववा धक्का दिला. अर्शदीपच्या चौथ्या षटकात १७ धावा चोपल्या गेल्याने आयर्लंडला शतकासमीप पोहोचता आले. जसप्रीत बुमराहने ३-१-६-२ अशी अप्रतिम गोलंदाजी केली.

अक्षर पटेलने ( १-३) एकच षटक फेकले, परंतु स्वतःच्याच गोलंदाजीवर अप्रितम झेल घेऊन विकेट मिळवली. मोहम्मद सिराजनेही ( ३-१-१३-१) प्रभावी मारा केला. पहिल्या डावानंतर हार्दिक पांड्या म्हणाला, "देशासाठी खेळणे नेहमीच खास असते, वर्ल्ड कप हे तर खूपच खास आहे आणि मी त्यात योगदान देऊ शकलो, याचा आनंद आहे. मला पहिली विकेट खूप आवडली. साधारणपणे यष्टींवर अनेकदा मारा करत नाही, मी बॅक ऑफ दी लेंथ गोलंदाजी करतो. पण या खेळपट्टीवर मला फुलर मारा करावा लागला. आम्ही भारतीय सर्वत्र आहोत, आम्ही जगावर राज्य करतो. आम्हाला येथेही प्रेक्षकांचा खूप पाठिंबा मिळाला आहे.''

 २०२२च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर अव्वल दहा संघांमध्ये आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त सर्वाधिक ४५ विकेट्स अर्शदीपने घेतल्या आहेत. त्याने पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदी ( ४४), बांगलादेशचा तस्कीन अहमद ( ३६) यांना मागे टाकले. शिवाय ट्वेंटी-२०त भारताकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये त्याने जसप्रीत बुमराहला ( २५) मागे टाकले. भुवनेश्वर कुमार ४७ विकेट्ससह अव्वल क्रमांकावर आहे आणि अर्शदीप ( २६) दुसऱ्या क्रमांकावर आला.   

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024हार्दिक पांड्याभारतआयर्लंड