Join us  

T20 World Cup 2024 IND vs IRE Live Match : बल्ले, बल्ले! अर्शदीप सिंगने एकाच षटकात दिले दोन धक्के, मोडला बुमराह, आफ्रिदीचा विक्रम, Video 

आजच्या लढतीपूर्वी भारताने आयर्लंडविरुद्ध ८ पैकी ७ सामने जिंकले आहेत आणि १ सामना अनिर्णित राहिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2024 8:26 PM

Open in App

ICC T20 World Cup 2024 IND vs IRE Live Scorecard - भारतीय संघाचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील प्रवास सुरू झाला आणि आयर्लंडविरुद्ध टॉस जिंकून त्यांनी गोलंदाजीचा निर्णय घेतला. विराट कोहलीचा आयपीएल २०२४ मधील फॉर्म पाहता तो रोहित शर्मासोबत सलामीला खेळणार का, हा प्रश्न सर्वांसमोर होता आणि त्याचे उत्तर हो असे मिळाले. यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, कुलदीप यादव व युझवेंद्र चहल आज प्लेइंग इलेव्हनमध्ये नाही. शिवम दुबे व हार्दिक पांड्या यांच्यासह रवींद्र जडेजा व अक्षर पटेल हे दोन अष्टपैलू संघात आहेत. मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह व अर्शदीप सिंग हे तीन जलदगती गोलंदाज संघात आहेत. ICC World Cup Live Match २००७च्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील स्टार खेळाडू युवराज सिंग आज ट्रॉफीसह टीम इंडियासोबत उभा होता. युवी या स्पर्धेचा अॅम्बेसिडर आहे. रोहित शर्मा व विराट कोहली हे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त दुसऱ्यांदा सलामीला एकत्रित येणार आहेत. यापूर्वी २०२१ मध्ये इंग्लंडविरुद्ध त्यांनी ९४ धावांची सलामी दिली होती. ट्वेंटी-२०त ओपनर म्हणून विराटने भारतासाठी ९ सामन्यांत ५७.१४ च्या सरासरीने ४०० धावा केल्या आहेत. तो ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत प्रथमच सलामीला येणार आहे. Ind vs Ire live Scorecard पॉल स्टर्लिंग व अँडी बालबर्नी ही जोडी तिसऱ्या षटकात अर्शदीप सिंगने तोडली. स्टर्लिंग २ धावांवर रिषभ पंतच्या हाती झेल देऊन परतला. त्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्याने बालबर्नीचा ( ५) त्रिफळा उडवला. आयर्लंडचा माजी कर्णधार स्तब्ध उभा राहिला. २०२२च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर अव्वल दहा संघांमध्ये आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त सर्वाधिक ४५ विकेट्स अर्शदीपने घेतल्या आहेत. त्याने पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदी ( ४४), बांगलादेशचा तस्कीन अहमद ( ३६) यांना मागे टाकले. शिवाय ट्वेंटी-२०त भारताकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये त्याने जसप्रीत बुमराहला ( २५) मागे टाकले. भुवनेश्वर कुमार ४७ विकेट्ससह अव्वल क्रमांकावर आहे आणि अर्शदीप ( २६) दुसऱ्या क्रमांकावर आला.  

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024अर्शदीप सिंगभारतआयर्लंड