Join us  

T20 World Cup 2024 IND vs IRE Live Match : रोहित शर्मा खंबीर अन् भारताला मिळाला धीर! नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड अन् २ मोठे पराक्रम 

भारतीय गोलंदाजांनी कमाल करून दाखवताना आयर्लंडचा संपूर्ण संघ १६ षटकांत ९६ धावांत तंबूत पाठवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2024 10:37 PM

Open in App

ICC T20 World Cup 2024 IND vs IRE Live Scorecard - रोहित शर्माने ( Rohit Sharma) अवघड खेळपट्टीवर अर्धशतकी खेळी करून भारताला विजयाच्या दिशेने नेले आहे. त्याने या खेळीत अनेक विक्रम मोडले. 

भारतीय गोलंदाजांनी कमाल करून दाखवताना आयर्लंडचा संपूर्ण संघ १६ षटकांत ९६ धावांत तंबूत पाठवला. अर्शदीपने पहिल्या स्पेलमध्ये ३-०-१८-२ असा मारा केला. हार्दिकने ४-१-२७-३ अशी अप्रतिम स्पेल टाकली.  जसप्रीत बुमराहने ३-१-६-२ अशी अप्रतिम गोलंदाजी केली. अक्षर पटेलने ( १-३) एकच षटक फेकले, परंतु स्वतःच्याच गोलंदाजीवर अप्रितम झेल घेऊन विकेट मिळवली. मोहम्मद सिराजनेही ( ३-१-१३-१) प्रभावी मारा केला. आयर्लंडकडून गॅरेथ डेलनी ( २६), जोश लिटल ( १४), कर्टीस कॅम्फर ( १२) व लॉर्कन टकर ( १०) यांनाच दुहेरी धावा करता आल्या. भारतीय गोलंदाजांनी १५ अतिरिक्त धावा दिल्या. 

पहिल्याच षटकात रोहितला जीवदान मिळाले आणि या खेळपट्टीवर फलंदाजी करणे सोपे नाही हे भारतीय फलंदाजांना कळून चुकले. विराट कोहली व रोहित प्रथमच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सलामीला आलेले पाहून चाहते आनंदित झाले. मात्र, तिसऱ्या षटकात पुढे येऊन फटका मारण्याच्या प्रयत्नात विराट ( २) थर्ड मॅनवर झेलबाद झाला. पण, रोहित खंबीरपणे उभा राहिला आणि आयर्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. त्याने आज आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त ४००० धावांचा टप्पा ओलांडला आणि विराट कोहली ( ४०३८) व बाबर आजम ( ४०२३) यांच्या पंक्तित स्थान पटकावले. 

पण, रोहितने सर्वात कमी म्हणजेच २८६० चेंडूंचा सामना करताना हा पराक्रम केला आणि विराट ( २९०० चेंडू) व बाबर ( ३०७९) यांना मागे टाकले.  पण, इनिंग्जमध्ये विराट ( १०७) व बाबर ( ११२) हे रोहितच्या ( १४४) पुढे आहेत. क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये ४००० हून अधिक धावा नाववर असलेले रोहित व विराट हे जगातील दोनच फलंदाज आहेत. रोहितने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६०० षटकार मारणाऱ्या पहिल्या फलंदाजाचा मान पटकावला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये १००० हून अधिक धावांचा विक्रमही रोहितने नावावर केला आणि विराट कोहली ( ११४२) व माहेला जयवर्धने ( १०१६) यांच्या पंक्तित स्थान पटकावले.  

 

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024रोहित शर्माविराट कोहलीभारतआयर्लंड