T20 World Cup 2024 IND vs IRE Live Match : ४९ धावांवर ७ विकेट्स! अर्शदीपनंतर हार्दिक पांड्या चमकला; जसप्रीत, सिराजचाही मारा, Video 

भारतीय गोलंदाजांनी ट्वेंटी-२०वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात आयर्लंडविरुद्ध वर्चस्व गाजवले.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 08:58 PM2024-06-05T20:58:08+5:302024-06-05T20:58:22+5:30

whatsapp join usJoin us
icc T20 World Cup 2024 live T20 int cricket match ind vs Ire scorecard online - Ireland 49/7 after 10.1 overs, Hardik Pandya has dismissed Tucker and Campher, while Jasprit Bumrah took care of Harry Tector 4(16), Video  | T20 World Cup 2024 IND vs IRE Live Match : ४९ धावांवर ७ विकेट्स! अर्शदीपनंतर हार्दिक पांड्या चमकला; जसप्रीत, सिराजचाही मारा, Video 

T20 World Cup 2024 IND vs IRE Live Match : ४९ धावांवर ७ विकेट्स! अर्शदीपनंतर हार्दिक पांड्या चमकला; जसप्रीत, सिराजचाही मारा, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC T20 World Cup 2024 IND vs IRE Live Scorecard - भारतीय गोलंदाजांनी ट्वेंटी-२०वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात आयर्लंडविरुद्ध वर्चस्व गाजवले. अर्शदीप सिंगने पॉवर प्लेमध्ये दोन धक्के दिल्यानंतर हार्दिक पांड्याने कमाल केली. त्याने दोन महत्त्वाच्या विकेट्स मिळवल्या आणि त्यात जसप्रीत बुमराह व मोहम्मद सिराज यांनीही यश मिळवले. भारतीय जलदगती गोलंदाजांसमोर आयर्लंडचा संघ अडखळताना दिसला. 

बल्ले, बल्ले! अर्शदीप सिंगने एकाच षटकात दिले दोन धक्के, मोडला बुमराह, आफ्रिदीचा विक्रम, Video 


Toss जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा रोहित शर्माचा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. विशेषतः अर्शदीप सिंगने त्याच्या पहिल्या स्पेलमध्ये ३-०-१८-२ अशी भन्नाट गोलंदाजी करून आयर्लंडच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवले. पॉल स्टर्लिंग ( २) व अँडी बालबर्नी ( ५) ही जोडी ९ धावांवर माघारी परतली. अर्शदीपने मोहम्मद सिराजसह गोलंदाजीची चांगली सुरुवात केली आणि त्यानंतर जसप्रीत बुमराहने वेगवान मारा केला. आयर्लंडला पॉवर प्लेमध्ये २ बाद २६ धावा करता आल्या. दुसऱ्या बाजूने हार्दिक पांड्याने गोलंदाजीचा मोर्चा सांभाळताना आयर्लंडला तिसरा झटका दिला. त्याने लोर्कन टकरचा ( १०) त्रिफळा उडवला.  IND vs IRE live T20 match, Ind vs Ire live Match updates


आयर्लंडचे फलंदाज गोंधळलेल्या, घाबरलेल्या परिस्थितीत दिसले आणि बुमराहने अप्रतिम बाऊन्सरवर त्यांना आणखी एक धक्का दिला. हॅरी टेक्टर ( ४) माघारी गेल्याने आयर्लंडची अवस्था ८ षटकांत ४ बाद ३६ अशी झाली. हार्दिक व मोहम्मद सिराज यांनी त्यानंतर अनुक्रमे कर्टीस कॅम्फर ( १२) आणि जॉर्ज डॉक्रेल ( ३) यांना बाद केले. हार्दिकने तिसरी विकेट घेताना मार्क एडरची ( ३) विकेट मिळवली. Ind vs Ire live Online match,  Ind vs Ire Latest Score card

Web Title: icc T20 World Cup 2024 live T20 int cricket match ind vs Ire scorecard online - Ireland 49/7 after 10.1 overs, Hardik Pandya has dismissed Tucker and Campher, while Jasprit Bumrah took care of Harry Tector 4(16), Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.