ICC T20 World Cup 2024 IND vs PAK Live Scorecard - भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात वाद होणार नाही, असं कधी झालेलं नाही. रविवारी न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटीमध्ये सुरू असलेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सामन्यादरम्यान, एक विमान मैदानावर 'रिलीज इम्रान खान' बॅनर घेऊन उडताना दिसले. पहिल्या षटकानंतर हलक्या पावसामुळे खेळ थांबला होता, तेव्हा हा प्रकार घडला. एएनआयने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
रोहित शर्माला Six खेचू दिला, नंतर सापळा रचून तशाच चेंडूवर बाद केलं, विराटही फेल
पावसाच्या विश्रांतीनंतर भारताची पडझड सुरू झाली. भारतीय संघाच्या सलामीवीरांना पाकिस्तानविरुद्ध अपयश आले. रोहित शर्माने पहिल्या षटकात षटकार खेचला खरा, परंतु शाहीन आफ्रिदीने सापळा रचून तशाच चेंडूवर रोहितला ( १३) झेलबाद केले. विराट कोहली ( ४) ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच सलग दोन सामन्यांत एकेरी धावेवर माघारी परतला. भारताचे दोन्ही सलामीवीर २.४ षटकांत १९ धावांवर बाद झाले. रोहितच्या विकेटनंतर अक्षर पटेलला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले गेले. उस्मानने सहाव्या षटकात रिषभ पंतचा ( ८) परतीचा झेल टाकला.
रिषभ व अक्षर यांनी ३० चेंडूंत ३९ धावांची भागीदारी करून सामन्यावर पकड घेण्यास सुरुवात केलीच होती, परंतु नसीम शाहने त्याची दुसरी विकेट घेताना अक्षरला ( २०) त्रिफळाचीत केले. रिषभला १८ धावांवर आणखी एक जीवदान मिळाले. रिषभने १०व्या षटकात हॅरिस रौफला सलग तीन चौकार खेचून संघाला ३ बाद ८१ धावांपर्यंत पोहोचवले. रिषभला रोखणे पाकिस्तानसाठी अवघड होऊन बसले, कारण तो त्याचे आडवेतिडवे शॉट्स अगदी सहजतेनं खेळून धावांचा पाऊस पाडत होता. पण, सूर्यकुमार यादव ( ७) रौफच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.
Web Title: icc T20 World Cup 2024 live T20 int cricket match ind vs Pak scorecard online - A plane was spotted carrying a 'Release Imran Khan' banner over the arena, video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.