ICC T20 World Cup 2024 IND vs PAK Live Scorecard - पाकिस्तानने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत आणखी एक लाजीरवाणा पराभव पत्करला. जगातील तगडे फलंदाज संघात असणाऱ्या भारताला त्यांच्या गोलंदाजांनी ११९ धावांवर गुंडाळले. पण, शेवटी त्यांनी माती खाल्लीच... पाकिस्तानला १२० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय गोलंदाजांनी रडकुंडीला आणले. जसप्रीत बुमराह व हार्दिक पांड्या यांनी मोक्याच्या क्षणी पाकिस्तानला धक्के दिले आणि सामन्याचे चित्रच बदलले. भारताने ६ धावांनी हा सामना जिंकून शेजाऱ्यांचा स्पर्धेबाहेरचा रस्ता जवळपास पक्का केला आहे.
मॅच सुरू असताना अनोखळी विमान मैदानावर उडाले अन् त्यावरील मॅसेज होतोय Viral
अमेरिकेविरुद्ध लाजीरवाणा पराभव पत्करणाऱ्या पाकिस्तानने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारताविरुद्ध अविश्वसनीय कामगिरी केली. नसीम शाह ( ३-२१) व हॅरिस रौफ ( ३-२१) यांच्यानंतर मोहम्मद आमीर ( २-२३) व शाहीन शाह आफ्रिदी ( १-२९) यांच्या माऱ्याला तोड नव्हती. विराट कोहली ( ४) सलग दुसऱ्या सामन्यात अपयशी ठरला. रोहित शर्मा ( १३), सूर्यकुमार यादव ( ७), शिवम दुबे ( ३), हार्दिक पांड्या ( ७) व रवींद्र जडेजा ( ०) चुकीचे फटके खेचून माघारी परतले. रिषभ पंत व अक्षर पटेल ( २०) यांनी तिसऱ्या विकेटसाठी जोडलेल्या ३९ धावांनी आधार दिला होता. पण, बाकीच्यांनी शरणागती पत्करली.ICC World Cup Live Match, Ind vs Pak live Scorecard
रिषभने ३१ चेंडूंत ६ चौकारांच्या मदतीने सर्वाधिक ४२ धावा केल्या. अर्शदीप सिंगने ९ धावांचे योगदान दिले, परंतु भारताचा संपूर्ण संघ १९ षटकांत ११९ धावांवर तंबूत परतला. ४ बाद ८९ वरून भारताने पुढील ३० धावांत सहा विकेट्स गमावल्या. ट्वेंटी-२०वर्ल्ड कप स्पर्धेतील भारताची ही प्रथम फलंदाजीनंतर तिसरी निचांक धावसंख्या आहे. यापूर्वी २०१६ मध्ये ७९ धावांवर टीम इंडिया ऑल आऊट झाली होती. ट्वेंटी-२०त ऑल आऊट झाल्यानंतर भारतीय संघाला सर्वच्या सर्व ११ सामन्यांत हार पत्करावी लागली आहे. पाकिस्तानने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच भारताला ऑल आऊट केले.ICC live tourament 2024, IND vs PAK live T20 match
जसप्रीतने १९वे षटक अप्रतिम टाकले आणि पाकिस्तानच्या जबड्यातून मॅच काढली. ३ धावा अन् १ विकेट घेत जसप्रीतने त्याची स्पेल ४-०-१४-३ अशी संपवली. शेवटच्या षटकात १८ धावा पाकिस्तानला करायच्या होत्या आणि त्या अशक्य होत्या. अर्शदीपने २०व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर इमाद वासीमला ( १५) बाद केले. रोहितने अचूक DRS घेतला. पाकिस्तानला २० षटकांत ७ बाद ११३ धावा करता आल्या आणि भारताने ६ धावांनी सामना जिंकला.
पाकिस्तानचे आव्हान संकटात...
या पराभवामुळे पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हान संकटात आले आहे. अ गटातील हा त्यांचा सलग दुसरा विजय ठरला आणि आता अमेरिका व भारत प्रत्येकी ४ गुणांसह आघाडीवर आहेत. पाकिस्तानने उर्वरित दोन सामने जिंकून त्यांचे ४ गुण होतील, परंतु त्याचवेळी त्यांना अमेरिकेच्या उर्वरित दोन सामन्यांत पराभवासाठी प्रार्थना करावी लागेल. अशा वेळी नेट रन रेट महत्त्वाचा ठरेल.