ICC T20 World Cup 2024 IND vs PAK Live Scorecard - आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील महामुकाबला भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातल्या लढतीत पावसाने व्यत्यय आणला होता. पण, ८ वाजता नाणेफेक झाली आणि ८.३० वाजता मॅच सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला. हा सामना पाहण्यासाठी स्टेडियम खचाखच भरलं होतं, जे यापूर्वीच्या सामन्यात चित्र दिसलं नाही. कर्णधार बाबर आजमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
न्यूयॉर्कमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यात पावसाने व्यत्यय आणलाच... तसा अंदाज व्यक्त केला गेला होताच. अर्ध्यातासाच्या विलंबाने हा सामना सुरू होणार आहे. भारताने आतापर्यंत ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध सातपैकी सहा सामन्यांत बाजी मारली आहे. पाकिस्तानविरुद्ध विराटने ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक ३०८ धावा केल्या असल्याने आजही त्याच्यावर सर्वांचे लक्ष आहे. ७.४५ वाजता खेळपट्टीवरील कव्हर्स हटवण्यात आले आणि अम्पायर्सनी खेळपट्टीची पाहणी केली. ८ वाजता टॉस होणार असून ८.३० वाजता मॅच सुरू होणार आहे आणि संपूर्ण २०-२० षटकं खेळवली जाणार आहेत.
पाकिस्तानच्या संघात एक बदल पाहायला मिळत आहे आणि आजम खानच्या जागी इमाद वासीमची निवड झाली आहे. तर रोहित शर्माने त्याच प्लेइंग इलेव्हनसह खेळण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
भारताचा संघ - रोहित शर्मा, विराट कोहली, रिषभ पंत, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.
पाकिस्तानचा संघ - बाबर आजम, मोहम्मद रिझवान, उस्मान खान, फखर जमान, शादाब खान, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ, नसीम शाह, मोहम्मद आमीर