ICC T20 World Cup 2024 IND vs PAK Live Scorecard - आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील महामुकाबला भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातल्या लढतीत पावसाने व्यत्यय आणला होता. पण, ८ वाजता नाणेफेक झाली. हा सामना पाहण्यासाठी स्टेडियम खचाखच भरलं होतं. कर्णधार बाबर आजमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, टॉस दरम्यान रोहित शर्माचा विसराळू स्वभाव पुन्हा दिसला आणि त्यामुळे बाबर आजम खळखळून हसला. पण, पुन्हा पाऊस सुरू झाल्यामुळे सामना वेळेत सुरू होण्याची शक्यता नाही.
पावसामुळे खेळपट्टी पाहता हा महत्त्वाचा निर्णय ठरणार आहे आणि रोहित शर्मालाही याची जाण असल्याने आम्हालाही प्रथम गोलंदाजी करायची होती, असे म्हटले. खेळपट्टी पाहता भारतीय संघात बदल अपेक्षित होता, परंतु रोहितने मागील सामन्यातील प्लेइंग इलेव्हनसहच मैदानावर उतरण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानने मात्र फॉर्माशी झगडणाऱ्या आजम खानला वगळून ऑलराऊंडर इमाद वासीमला प्लेइंग इलेव्हनमध्ये घेतले. इमाद दुखापतीमुळे मागील सामना खेळला नव्हता.
मागील १० वर्षांत India vs Pakistan यांच्यात ७ लढती झाल्या आणि सातही सामने लक्ष्याचा पाठलाग करणारा संघ जिंकला आहे. त्यामुळे ही टीम इंडियासाठी आनंदाची बातमी आहे. रोहित शर्मा टॉसच्या वेळी हे विसरला की नाणं त्याच्या खिशात आहे आणि तो मॅच रेफरीकडे मागू लागला. त्याला आठवण करून दिल्यानंतर त्याने खिशातून नाणं काढलं आणि हवेत भिरकावलं. रोहितचा विसराळू स्वभाव पाहून बाबरसह सारेच हसले.
भारताचा संघ - रोहित शर्मा, विराट कोहली, रिषभ पंत, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.
पाकिस्तानचा संघ - बाबर आजम, मोहम्मद रिझवान, उस्मान खान, फखर जमान, शादाब खान, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ, नसीम शाह, मोहम्मद आमीर
Web Title: icc T20 World Cup 2024 live T20 int cricket match ind vs Pak scorecard online - Rohit Sharma forgot he had the toss coin inside his pocket, rain has picked up a bit. Everyone has gone back indoors, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.