T20 World Cup 2024 IND vs PAK Live Match : रोहित शर्माला Six खेचू दिला, नंतर सापळा रचून तशाच चेंडूवर बाद केलं, विराटही फेल

रोहित शर्माने पहिल्या षटकात षटकार खेचून भारतीय चाहत्यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. पण,

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2024 10:07 PM2024-06-09T22:07:37+5:302024-06-09T22:07:52+5:30

whatsapp join usJoin us
icc T20 World Cup 2024 live T20 int cricket match ind vs Pak scorecard online -  Rohit Sharma goes for 13 of 12 balls, For the first time ever Virat Kohli got out two single digit scores in an T20 World Cup edition, Video | T20 World Cup 2024 IND vs PAK Live Match : रोहित शर्माला Six खेचू दिला, नंतर सापळा रचून तशाच चेंडूवर बाद केलं, विराटही फेल

T20 World Cup 2024 IND vs PAK Live Match : रोहित शर्माला Six खेचू दिला, नंतर सापळा रचून तशाच चेंडूवर बाद केलं, विराटही फेल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC T20 World Cup 2024 IND vs PAK Live Scorecard - भारतीय संघाच्या सलामीवीरांना पाकिस्तानविरुद्ध अपयश आले. रोहित शर्माने पहिल्या षटकात षटकार खेचून भारतीय चाहत्यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. पण, शाहीन आफ्रिदीने सापळा रचून तशाच चेंडूवर रोहितला झेलबाद केले. विराट कोहलीचा अपयशाचा पाढा सलग दुसऱ्या सामन्यात कायम राहिला आणि ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात विराट प्रथमच सलग दोन सामन्यांत एकेरी धावेवर माघारी परतला. भारताचे दोन्ही सलामीवीर २.४ षटकांत १९ धावांवर माघारी परतले. 


भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात पावसाचा 'खेळ' सुरू आहे... किमान ३-४ वेळा सामना थांबवला गेला आणि त्यामुळे चाहत्यांचा हिरमोड होत होता. दोन्ही संघांचे खेळाडूही वैतागलेले दिसले. नाणेफेक जिंकून पाकिस्तानने गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि रोहित शर्माने तिसरा चेंडू मिडविकेटच्या दिशेने सीमापार पाठवून शाहीन आफ्रिदीला झटका दिला. १ षटक पूर्ण झाल्यानंतर मुसळधार पाऊस सुरू झाला आणि सर्व खेळाडूंना पुन्हा डगआऊटमध्ये जावे लागले. ९.१५ वाजता पाऊसाने विश्रांती घेतली. सामना सुरू झाल्यानंतर नसीम शाहने भारताला पहिला धक्का दिला, विराट कोहली ( ४) पुन्हा फेल झाला. रोहित चांगल्य लयमध्ये दिसत होता, परंतु शाहीनने पुन्हा पायावर चेंडू टाकून त्याला जाळ्यात अडकवले. रोहित १३ धावांवर हॅरीस रौफला झेल देऊन माघारी गेला.


रोहितने जाता जाता एक विक्रम नावावर केला. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ८ संघांविरुद्ध प्रत्येकी १०००+ धावा करणाऱ्या भारतीय फलंदाज सौरव गांगुली, राहुल द्रविड, विराट कोहली यांच्याशी बरोबरी केली. सचिन तेंडुलकरने ९ संघांविरुद्ध हा पराक्रम केला आहे. रोहितच्या विकेटनंतर अक्षर पटेलला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले गेले. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये भारतासाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा तो दहावा खेळाडू ठरला. ICC च्या स्पर्धांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय कर्णधारांमध्ये रोहितने ( ७७८) दुसरे स्थान पटकावताना विराटला ( ७६९) मागे टाकले. महेंद्रसिंग धोनी ४६ इनिंग्जमध्ये १०३७ धावांसह अव्वल आहे.   

 

Web Title: icc T20 World Cup 2024 live T20 int cricket match ind vs Pak scorecard online -  Rohit Sharma goes for 13 of 12 balls, For the first time ever Virat Kohli got out two single digit scores in an T20 World Cup edition, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.