ICC T20 World Cup 2024 IND vs PAK Live Scorecard - भारतीय संघाच्या सलामीवीरांना पाकिस्तानविरुद्ध अपयश आले. रोहित शर्माने पहिल्या षटकात षटकार खेचून भारतीय चाहत्यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. पण, शाहीन आफ्रिदीने सापळा रचून तशाच चेंडूवर रोहितला झेलबाद केले. विराट कोहलीचा अपयशाचा पाढा सलग दुसऱ्या सामन्यात कायम राहिला आणि ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात विराट प्रथमच सलग दोन सामन्यांत एकेरी धावेवर माघारी परतला. भारताचे दोन्ही सलामीवीर २.४ षटकांत १९ धावांवर माघारी परतले.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात पावसाचा 'खेळ' सुरू आहे... किमान ३-४ वेळा सामना थांबवला गेला आणि त्यामुळे चाहत्यांचा हिरमोड होत होता. दोन्ही संघांचे खेळाडूही वैतागलेले दिसले. नाणेफेक जिंकून पाकिस्तानने गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि रोहित शर्माने तिसरा चेंडू मिडविकेटच्या दिशेने सीमापार पाठवून शाहीन आफ्रिदीला झटका दिला. १ षटक पूर्ण झाल्यानंतर मुसळधार पाऊस सुरू झाला आणि सर्व खेळाडूंना पुन्हा डगआऊटमध्ये जावे लागले. ९.१५ वाजता पाऊसाने विश्रांती घेतली. सामना सुरू झाल्यानंतर नसीम शाहने भारताला पहिला धक्का दिला, विराट कोहली ( ४) पुन्हा फेल झाला. रोहित चांगल्य लयमध्ये दिसत होता, परंतु शाहीनने पुन्हा पायावर चेंडू टाकून त्याला जाळ्यात अडकवले. रोहित १३ धावांवर हॅरीस रौफला झेल देऊन माघारी गेला.