Join us  

T20 World Cup 2024 IND vs USA Live Match : अर्शदीप सिंगची पहिल्याच षटकात ऐतिहासिक भरारी! अमेरिकेचे २ फलंदाज पाठवले माघारी

रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताच बदल केलेला नाही.  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 8:15 PM

Open in App

ICC T20 World Cup 2024 IND vs USA Live Scorecard -  भारत विरुद्ध अमेरिका या सामन्यावर पाकिस्तानचे भविष्य अवलंबून आहे. अमेरिकाभारत यांनी अ गटात सलग दोन विजय मिळवून सुपर ८ च्या दिशेने कूच करणार आहे.  रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताच बदल केलेला नाही.  अमेरिका संघाचा कर्णधार मोनांक पटेल या सामन्याला खांद्याच्या दुखापतीमुळे मुकला आहे. विराट कोहलीने १४ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० पदार्पण केले होते. १२ जून २०१० मध्ये त्याने झिम्बाब्वेविरुद्ध नाबाद २६ धावा केल्या होत्या. या सामन्यासह विराटने ( ५२५) सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याच्या यादीत शाहीद आफ्रिदीला ( ५२४ ) मागे टाकले. ICC T20 World Cup Match, ICC World Cup Live Match

अर्शदीप सिंगने भारताला दमदार सुरुवात करून देताना पहिल्या चेंडूवर शयान जहांगिरला पायचीत केले आणि शेवटच्या चेंडूवर एंड्रियस गौसला ( २) हार्दिक पांड्याकरवी झेलबाद करून माघारी पाठवले. अमेरिकेला पहिल्याच षटकात ३ धावांवर दोन धक्के बसले. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत डावाच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा अर्शदीप हा भारताचा दुसरा गोलंदाज ठरला. यापूर्वी भुवनेश्वर कुमारने (  दुसऱ्या डावात) २०२२च्या वर्ल्ड कपमध्ये झिम्बाब्वेच्या वेस्ली माझेव्हेरेला बाद केले होते. त्यामुळे अर्शदीप हा सामन्याच्या पहिल्या चेंडूवर ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये विकेट घेणारा पहिला गोलंदाज ठरला.  वर्ल्ड कपमध्ये पहिल्याच षटकात दोन विकेट्स घेणारा तो तिसरा डावखुरा जलदगती गोलंदाज ठरला. रुबेन ट्रम्पेलमन ( NAM vs OMN) आणि फझहल फारूकी (  AFG vs UGA) यांनी अशी कामगिरी केलीय.  Ind vs USA live Scorecard, ICC live tourament 2024

भारताचा संघ- रोहित शर्मा, विराट कोहली, रिषभ पंत, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग 

अमेरिकेचा संघ - स्टीव्हन टेलर, शयान जहांगिर, एंड्रीयस गौस, नितीश कुमार, आरोन जोन्स, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, शॅडली व्हॅन श्वेलक्वाक, जसदीप सिंग, सौरभ नेत्रावळकर, अली खान 

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024अर्शदीप सिंगभारतअमेरिकाभुवनेश्वर कुमार