Join us  

T20 World Cup 2024 IND vs USA Live Match : सिराजचा अफलातून झेल, अर्शदीपचा भेदक मारा! तरीही पाकिस्तानपेक्षा अमेरिका खेळला बरा 

अमेरिकेच्या फलंदाजांनी ते पाकिस्तानपेक्षा सरस का आहेत हे आज दाखवून दिले.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 9:37 PM

Open in App

ICC T20 World Cup 2024 IND vs USA Live Scorecard - अमेरिकेच्या फलंदाजांनी ते पाकिस्तानपेक्षा सरस का आहेत हे आज दाखवून दिले. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील विजयी मालिका कायम राखण्याच्या निर्धाराने मैदानावर उतरलेल्या अमेरिकेची सुरुवात काही खास झाली नाही. अर्शदीप सिंगने पहिल्याच षटकात दोन धक्के देत विक्रम नोंदवला. पण, स्टीव्हन टेलर व नितीश कुमार यांची चांगली फटकेबाजी करून आव्हानात्मक लक्ष्य उभे केले. ICC T20 World Cup Match, ICC World Cup Live Match

अर्शदीप सिंगची पहिल्याच षटकात ऐतिहासिक भरारी! अमेरिकेचे २ फलंदाज पाठवले माघारी

रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताच बदल केलेला नाही.  अमेरिका संघाचा कर्णधार मोनांक पटेल या सामन्याला खांद्याच्या दुखापतीमुळे मुकला आहे.  अर्शदीप सिंगनेभारताला दमदार सुरुवात करून देताना पहिल्या चेंडूवर शयान जहांगिरला पायचीत केले आणि शेवटच्या चेंडूवर एंड्रियस गौसला ( २) हार्दिक पांड्याकरवी झेलबाद करून माघारी पाठवले. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत डावाच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा अर्शदीप हा भारताचा दुसरा गोलंदाज ठरला. अमेरिकेला पॉवर प्लेमध्ये २ बाद १८ धावा करता आल्या, ज्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील भारताविरुद्धच्या संयुक्तरित्या ( ३ बाद १८ धावा, श्रीलंका, २०२२) निचांक धावा आहेत.  Ind vs USA live Scorecard, ICC live tourament 2024, IND vs USA live T20 match हार्दिक पांड्याने आठव्या षटकात आरोन जोन्सला ( ११) बाऊन्सवर फटका मारण्यास भाग पाडले आणि मोहम्मद सिराजने सीमारेषेवर सोपा झेल घेतला. स्टीव्हन टेलर ( २४) जोरदार फटकेबाजी करत होता, परंतु अक्षर पटेलने टाकलेला चेंडू बॅटची कड घेऊन यष्टिंवर आदळला. अमेरिकेला ५६ धावांवर चौथा झटका बसला. नितीश कुमार खणखणीत फटके खेचून टीम इंडियाची डोकेदुखी वाढवताना दिसला आणि रोहितने लगेचच गोलंदाजीत बदल करताना अर्शदीपला आणले. अर्शदीपच्या चेंडूवर नितीशने उत्तुंग फटका खेचला, परंतु मोहम्मद सिराजने तितकाच अफलातून झेल टिपला. नितीश २३ चेंडूत ४ चौकार व १ षटकारासह २७ धावांवर बाद झाला. Ind vs USA Latest Score card, Ind vs USA live streaming हार्दिकच्या चौथ्या षटकात कोरी अँडरसनने ( १५) पुढे येऊन उत्तुंग फटका मारला, परंतु रिषभ पंतने उंच उडालेला चेंडू तितक्याच चतुराईने टिपला. अर्शदीपने त्याच्या चौथ्या षटकात आणखी एक विकेट घेतली. त्याने ४ षटकांत ९ धावांत ४ विकेट्स घेतल्या. अमेरिकेने ८ बाद ११० धावा केल्या. India v USA live scorecard  

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024भारतअमेरिकाअर्शदीप सिंगमोहम्मद सिराज