ICC T20 World Cup 2024 IND vs USA Live Scorecard - ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धावा नावावर असलेल्या विराट कोहलीने ( Virat Kohli) पुन्हा एकदा चाहत्यांना निराश केले. अमेरिकेचा गोलंदाज सौरभ नेत्रावळकरने ( Saurabh Netravalkar ) विराटला गोल्डन डकवर माघारी पाठवले. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहात विराट प्रथमच गोल्डन डकवर माघारी परतला. सौरभने त्यानंतर कर्णधार रोहित शर्माचीही विकेट घेऊन भारताला मोठा धक्का दिला.
४-०-९-४! अर्शदीप सिंगने अमेरिकेविरुद्ध ५ वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवले; झहीर खानलाही मागे टाकले
विराट कोहलीचे अपयशाचे सत्र याही सामन्यात कायम राहिले आणि सौरभ नेत्रावळकरने त्याला गोल्डन डकवर माघारी पाठवले. तो ३६ वेळा भोपळ्यावर बाद झाला आणि अनिल कुंबळेचा ( ३५) विक्रम मोडला. नेत्रावरळकरने त्याच्या पुढच्या षटकात कर्णधार रोहित शर्माला ( ३) चुकीचा फटका मारण्यास भाग पाडले आणि हरमीत सिंगने अफलातून झेल घेतला. भारताचे दोन्ही सलामीवीर १० धावांवर तंबूत परतले. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांद व एकूण ९ वेळा ट्वेंटी-२०त रोहित व विराट एकाच सामन्यात एकेरी धावसंख्येवर माघारी परतले. सूर्यकुमार यादव व रिषभ पंत यांनी काहीकाळ खिंड लढवली, परंतु अली खानने अप्रतिम चेंडूवर रिषभचा ( १८) त्रिफळा उडवून भारताला ३९ धावांवर तिसरा धक्का दिला.
तत्पूर्वी, अर्शदीप सिंगने ( ARSHDEEP SINGH ) आज मैदान गाजवले. अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात त्याने ४ षटकांत ९ धावांत ४ विकेट्स घेऊन विश्वविक्रमी कामगिरी केली. त्याच्या भेदक माऱ्यासमोर अमेरिकेला ८ बाद ११० धावा करता आल्या. हार्दिक पांड्या ( ४-१-१४-२), अक्षर पटेल ( १-२५) यांच्यासह भारताच्या अन्य गोलंदाजांनी चांगला मारा केला. अमेरिकेसाठी स्टीव्हन टेलर ( २४), नितीश कुमार ( २७), कोरी अँडरसन ( १५), आरोन जोन्स ( ११) व शादली व्हॅन ( ११) यांनी चांगले योगदान दिले.
Web Title: icc T20 World Cup 2024 live T20 int cricket match ind vs Usa scorecard online - USA's Saurabh Netravalkar hands Virat Kohli his first ever duck in T20 World Cups, India 3/39 Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.