Join us  

विराट कोहलीला अमेरिकेतही लाभली ओळख!, नागपूरच्या विद्यार्थिनीची माहिती

Virat Kohli News: कालपर्यंत अमेरिकेत केवळ ‘होम रन’ची चर्चा व्हायची. आज स्थानिकांना ‘रन’ची महती पटली. बेसबॉलला सर्वस्व मानणाऱ्या अमेरिकेतील नागरिकांमध्ये क्रिकेटबाबत रुची वाढविण्याच्या हेतूने आयसीसीने येथे टी-२० विश्वचषकाचे आयोजन केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2024 6:40 AM

Open in App

- रवींद्र चोपडेनागपूर - कालपर्यंत अमेरिकेत केवळ ‘होम रन’ची चर्चा व्हायची. आज स्थानिकांना ‘रन’ची महती पटली. बेसबॉलला सर्वस्व मानणाऱ्या अमेरिकेतील नागरिकांमध्ये क्रिकेटबाबत रुची वाढविण्याच्या हेतूने आयसीसीने येथे टी-२० विश्वचषकाचे आयोजन केले आहे. न्यूयॉर्कमधील नागरिक विराट कोहलीला ओळखतात; पण विश्वचषकाच्या निमित्ताने अमेरिकेतील नागरिक या दिग्गज खेळाडूबाबत अधिक जाणून घेण्यास उत्सुक दिसले.

भारतीय नागरिकांमध्ये टी-शर्टची क्रेझ स्नेहा वैद्य ही नागपूरची विद्यार्थिनी  पिट्सबर्गच्या (पेन्सिल्व्हानिया)  ड्युक्सन विद्यापीठात शिक्षण घेत आहे. स्नेहा स्वत: क्रिकेट चाहती असल्याने भारत-पाक सामन्यासाठी पिट्सबर्ग येथून सहा तासांचा कार प्रवास करीत ती न्यूयॉर्कला पोहोचली. ‘लोकमत’शी संवाद साधताना ती म्हणाली, ‘टी-२० विश्वचषकाची घोषणा होताच अमेरिकेतील भारतीय नागरिकांमध्ये भारत-पाक सामन्याबाबत प्रचंड उत्कंठा पाहायला मिळत आहे. टीम इंडियाचे टी-शर्ट घालून नागरिक बार, रेस्टॉरंट आणि रस्त्यांवर फिरताना दिसतात.  स्नेहाने सांगितले की, न्यूयॉर्क आणि न्यू जर्सी येथे भारतीय मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. न्यू जर्सीहून अनेक जण भारत-पाक सामन्यासाठी न्यूयॉर्कला पोहोचले.  

रोनाल्डो-मेस्सीसारखा कोहली  विराटची क्रेझ भारतीयांमध्ये तर आहेच; पण आता अमेरिकन नागरिकही त्याच्याबाबत जाणून घेण्यास उत्सुक आहेत. फुटबॉलमध्ये रोनाल्डो आणि मेस्सीची जी लोकप्रियता आहे, ती क्रिकेटमध्ये कोहलीला लाभल्याची माहिती भारतीय लोक स्थानिकांना देतात. क्रिकेटला लोकप्रिय करण्यासाठी आयसीसीने वेस्ट इंडीजच्या संयुक्त विद्यमाने अमेरिकेला    टी-२० विश्वचषकाचे यजमानपद दिले. मूळ अमेरिकन नागरिकांमध्ये क्रिकेटबाबत रुची निर्माण करणे हा मुख्य हेतू त्यामागे आहे; पण बेसबॉल हा इथला लोकप्रिय प्रकार. या देशाचा राष्ट्रीय खेळ. बेसबॉलच्या पंक्तीत क्रिकेट येण्यास वेळ लागेल. ही तर केवळ सुरुवात म्हणावी लागेल.

टॅग्स :आयसीसी विश्वचषक टी-२०भारतीय क्रिकेट संघविराट कोहली