Hardik Pandya ICC T20 World Cup: आयपीएल २०२२ झालं आता हार्दिक पांड्याला टीम इंडियासाठी जिंकायचाय ट्वेंटी-२० वर्ल्ड कप!

मागील वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाला साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला होता. हार्दिक पांड्या त्या संघाचा सदस्य असूनही तंदुरुस्तीच्या कारणास्तव ना त्याने धड गोलंदाजी केली, ना फलंदाजीत कमाल दाखवली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 03:58 PM2022-05-30T15:58:39+5:302022-05-30T15:59:08+5:30

whatsapp join usJoin us
ICC T20 World Cup: Hardik Pandya now desperate to WIN World Cup for India in Australia | Hardik Pandya ICC T20 World Cup: आयपीएल २०२२ झालं आता हार्दिक पांड्याला टीम इंडियासाठी जिंकायचाय ट्वेंटी-२० वर्ल्ड कप!

Hardik Pandya ICC T20 World Cup: आयपीएल २०२२ झालं आता हार्दिक पांड्याला टीम इंडियासाठी जिंकायचाय ट्वेंटी-२० वर्ल्ड कप!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

गुजरात टायटन्सला पहिल्याच प्रयत्नात आयपीएल २०२२चे जेतेपद पटकावून दिल्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्याला ( Hardik Pandya) ऑस्ट्रेलियात होणारा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खुणावतोय... मागील वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाला साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला होता. पाकिस्तान व न्यूझीलंडकडून भारताचा दारूण पराभव झाला होता. हार्दिक पांड्या त्या संघाचा सदस्य असूनही तंदुरुस्तीच्या कारणास्तव ना त्याने धड गोलंदाजी केली, ना फलंदाजीत कमाल दाखवली. पण, आता तो पुर्णपणे तंदुरुस्त झाला आहे आणि त्याने १४५ kmph च्या वेगाने मारा करून फिटनेस सिद्ध केली आहे. आयपीएल २०२२च्या फायनलमध्ये त्याने प्लेअर ऑफ दी मॅचचा पुरस्कार पटकावला आहे.

राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या फायनलमध्ये हार्दिकने १७ धावांत ३ विकेट्स घेतल्या आणि ३४ धावाही केल्या. त्याने शुबमन गिलसोबत केलेली अर्धशतकी भागीदारी महत्त्वाची ठरली. आता हार्दिकला आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खुणावतोय. त्यासाठी तो सज्ज आहे. ९ जूनपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेतून हार्दिक टीम इंडियात पुनरागमन करणार आहे आणि त्याच्या कामगिरीकडे साऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. तो म्हणाला,''काहीही झालं तरी आता भारतासाठी वर्ल्ड कप जिंकायचा आहे. मी सर्वोत्तम देण्यासाठी तयार आहे. माझ्यासाठी नेहमीच संघ पहिला राहिला आहे. संघाला जास्तीत जास्त देणे, हे माझे लक्ष्य आहे.''

''भारताकडून खेळणे म्हणजे स्वप्न सत्यात उतरण्यासारखे आहे. मग ते कितीही सामने असोत. देशाचे प्रतिनिधित्व करायला मिळणे, हे मी माझे भाग्य समजतो. भारतीय संघाचा सदस्य म्हणून मला खूप प्रेम व पाठिंबा मिळाला. त्यामुळे लाँग टर्म असो किंवा शॉर्ट टर्म मला कोणत्याही परिस्थितीत वर्ल्ड कप जिंकायचा आहे,''असे हार्दिकने म्हटले.
  
भारतीय संघाचे संपूर्ण वेळापत्रक
२३ ऑक्टोबर - विरुद्ध पाकिस्तान, मेलबर्न; दुपारी १.३० वाजल्यापासून 
२७ ऑक्टोबर - विरुद्ध ग्रुप ए चा उप विजेता, सिडनी; दुपारी १२.३० वाजल्यापासून
३० ऑक्टोबर - विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पर्थ; सायंकाळी ४.३० वाजल्यापासून 
२ नोव्हेंबर - विरुद्ध बांगलादेश, एडिलेड; दुपारी १.३० वाजल्यापासून
६ नोव्हेंबर - विरुद्ध ग्रुप बी चा विजेता, मेलबर्न;  दुपारी १.३० वाजल्यापासून

Web Title: ICC T20 World Cup: Hardik Pandya now desperate to WIN World Cup for India in Australia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.