T20 World Cup 2022, Sachin Tendulkar’s PREDICTION : भारत-पाकिस्तान यांच्यातल्या ( India vs Pakistan Match) महामुकाबल्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत येत्या २३ ऑक्टोबरला कट्टर प्रतिस्पर्धी मेलबर्न क्रिकेट मैदानावर एकमेकांना भिडणार आहेत. जवळपास लाख भर तिकिटांची विक्री झाली आहे आणि हायव्होल्टेज सामन्याची हवा आतापासूनच सुरू झालीय. मागच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत बाबर आजमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाने भारतावर दणदणीत विजय मिळवला होता. त्यानंतर IND vs PAK आशिया चषक २०२२मध्ये दोनवेळा भिडले आणि १-१ अशी बरोबरी राहिली. त्यामुळे मेलबर्नवर कोण बाजी मारतो, याची उत्सुकता आहे. महान फलंदाज सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) यानेही या सामन्याबाबत त्याचे मत मांडले आणि रोहित शर्मा अँड टीम बाजी मारेल अशी भविष्यवाणी केली. सचिनने चार सेमीफायनलिस्टही जाहीर केले.
ऑस्ट्रेलियावरील विजयानंतरही रोहित शर्मा नाराज; सूर्यकुमारचा दाखल देत टोचले इतरांचे कान
Telegraph ला दिलेल्या मुलाखतीत सचिन तेंडुलकरने India vs Pakistan सामन्यात भारत बाजी मारेल असे जाहीर करून टाकले. तो म्हणाला,''टीम इंडियाच फेव्हरिट आहे. माझं मन हे नेहमीच भारताच्या बाजूने आहे आणि भारतानेच विजय मिळवावा असे नेहमी वाटते. मी भारतीय आहे म्हणून हे बोलत नाही, तर ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्यांवर भारतीय संघ वर्चस्व गाजवेल, याचा मला विश्वास आहे. त्यामुळे यावेळी भारतीय संघ विजय मिळवले.''
सचिन तेंडुलकरने यावेळी चार सेमीफायनलिस्टमध्ये भारतासह पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया व इंग्लंड या संघ जातील असे भविष्य वर्तविले. न्यूझीलंड व दक्षिण आफ्रिका हे डार्क हॉर्स ठरू शकतील असे सांगताना ऑस्ट्रेलियातील खेळपट्टींचा त्यांच्याकडे चांगला अनुभव असल्याचे सचिनने म्हटले. ''भारतीय संघाला चांगली संधी आहे. भारतीय संघ संतुलित आहे. त्यामुळे भारतीय जेतेपदापर्यंत पोहोचल्यास आश्चर्य वाटायला नको,''असेही त्याने म्हटले.
भारत-पाकिस्तान सामन्यावर पावसाचं सावट
weather.com च्या अंदाजानुसार २३ ऑक्टोबरला मेलबर्नमध्ये पावसाची शक्यता आहे. रविवारी मेलबर्नमध्ये दुपारच्या सुमारास वातावरण १८ डिग्री इतकं राहील. याच वेळी पावसाचा अंदाज ७० टक्के इतका वर्तविण्यात आला आहे. ६ मिमी इतका पाऊस पडू शकतो असा अंदाज आहे. फक्त दिवसाच नव्हे, तर रात्री देखील पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यादरम्यान हवेचा वेग १५ केएमपीएच इतका असू शकतो.
भारत- रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, आर.अश्विन, यजुवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदिप सिंग, मोहम्मद शमी; राखीव खेळाडू- श्रेयस अय्यर, रवि बिश्नोई, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर
पाकिस्तान- बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, हैदर अली, हारिस राऊफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम ज्युनिअर, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद, फखर जमान; राखीव खेळाडू- मोहम्मद हारिस, उस्मान कादिर आणि शाहनवाज दहानी.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: ICC T20 World CUP: India to beat Pakistan in tournament opener & INDIA, England, Pakistan, Australia’ will be four SEMIFINALIST, Sachin Tendulkar’s PREDICTION
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.