ICC T20 World Cup: पाकिस्तानच्या वर्ल्ड कप संघावर कर्णधार बाबर आझम नाराज; PCBकडून सारवासारव!

Babar Azam unhappy with the T20 World Cup squad of Pakistan : पाकिस्तान क्रिकेट मंडळानं ( PCB) आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सोमवारी संघ जाहीर केला. यात काही आश्चर्यजनक नावं दिसल्यानं पाकिस्तानच्या क्रिकेट चाहत्यांना धक्काच बसला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 12:12 PM2021-09-08T12:12:56+5:302021-09-08T12:14:30+5:30

whatsapp join usJoin us
ICC T20 World Cup: Pakistan captain Babar Azam unhappy with squad; PCB breaks silence | ICC T20 World Cup: पाकिस्तानच्या वर्ल्ड कप संघावर कर्णधार बाबर आझम नाराज; PCBकडून सारवासारव!

ICC T20 World Cup: पाकिस्तानच्या वर्ल्ड कप संघावर कर्णधार बाबर आझम नाराज; PCBकडून सारवासारव!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Babar Azam unhappy with the T20 World Cup squad of Pakistan : पाकिस्तान क्रिकेट मंडळानं ( PCB) आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सोमवारी संघ जाहीर केला. यात काही आश्चर्यजनक नावं दिसल्यानं पाकिस्तानच्या क्रिकेट चाहत्यांना धक्काच बसला. स्वतः कर्णधार बाबर आझम या निवडीवर नाराज असल्याच्या बातम्या काल पाकिस्तानी प्रसारमाध्यमांमध्ये होत्या. ही संघ निवड करताना कर्णधारालाच विश्वासात न घेतल्याचा दावा केला जात आहे. आझम खान व सोहैब मक्सूद यांच्या निवडीवरून आझम नाराज आहे. 

सुनील गावस्कर यांच्या वर्ल्ड कप संघात ना शिखर धवन, ना श्रेयस अय्यर; सुचवलेत तगडे पर्याय

PCBच्या चेअरमनपदी लवकरच विराजमान होणाऱ्या रमीझ राजा यांच्याशी चर्चा करून निवड समितीनं खान व मस्कूद यांची निवड केल्याचे म्हटले जात आहे. पण, बाबर आझमला संघात फहीम अश्रफ व फाखर जमान हवे होते. त्यासाठी बाबरनं रमीज राजा यांच्यासोबत चर्चा केली होती, परंतु राजा यांनी त्याचं ऐकलं नाही. तू तुझ्या खेळावर लक्ष दे, संघ निवडीवर नाही, असा मॅसेज त्याला पाठवला गेला, असे वृत्त Geo News ने दिले आहे.  

पाकिस्तानच्या क्रिकेटमध्ये मोठी खळबळ; वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर होताच प्रशिक्षकांचा राजीनामा!

दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट मंडळानं हे सर्व वृत्त फेटाळून लावले आहेत.''पाकिस्तानच्या संघ निवडीवरून वाद सुरू आहे आणि बाबर आझम नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत, त्या सर्व अफवा आहेत,'' असे PCBचे CEO वासीम खान  यांनी सांगितले. बाबार आझमचा या संघाला पूर्णपणे पाठिंबा असल्याचेही त्यानं नमुद केले.   

शोएब मलिकला वर्ल्ड कप संघातून डच्चू; मुख्य प्रशिक्षकासह, गोलंदाजी प्रशिक्षकाचाही राजीनामा!

पाकिस्तान क्रिकेट मंडळानं ( PCB) आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी त्यांच्या संघाची घोषणा केली. दुपारी १२ वाजता पाकिस्ताननं वर्ल्ड कप संघ जाहीर केला आणि २.३० वाजता संघाचे मुख्य प्रशिक्षक मिसबाह उल हक यांच्यासह गोलंदाजी प्रशिक्षक वकार युनिस यांनी राजीनामा दिला. 

पाकिस्तानचा वर्ल्ड कप संघ - बाबर आझम, आसीफ अली, खुशदील शाह, मोहम्मद हाफिज, सोहैब मक्सूद, आझम खान, मोहम्मद रिझवान, इमाद वासीम, मोहम्मद नवाझ, मोहम्मद वासीम, शाबाद खान, हॅरीस रौफ, हसन अली, मोहम्मद हस्नैन,  शाहिन शाह आफ्रिदी ( Pakistan's squad for T20 World Cup: Babar (C), Shadab, Hafeez, Shaheen Afridi, Rauf, Asif Ali, Azam Khan, Imad, Khushdil, Hasnain, Rizwan, Nawaz, Wasim and Sohaib, Reserves - Usman Qadir, Fakhar Zaman and Dhani.) 

Web Title: ICC T20 World Cup: Pakistan captain Babar Azam unhappy with squad; PCB breaks silence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.