भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी (Mahendra singh Dhoni) यानं क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर आता टीम इंडियामध्ये (Team India) यष्टीरक्षकाची जबाबदारी आता ऋषभ पंत पार पाडत आहे. पंत अनेकदा स्टंप्समागे असं काही करतो यावरू फॅन्स त्याची तुलना आपणहूनच धोनीशी करू लागतात. युएई आणि ओमानमध्ये संयुक्तरित्या खेळवल्या जाणाऱ्या टी २० विश्वचषक स्पर्धेतील (T20 World Cup) भारत विरुद्ध नामीबीयाच्या सामन्यात त्यानं असं काही केलं, की फॅन्सनं धोनीची आठवण काढली. त्यानं सामन्यादरम्यान धोनी स्टाईल फिल्डिंग केली. यावर चाहत्यांनी देखील लाईक्स आणि कमेंट्सचा भडिमार केला. हा व्हिडीओ आयसीसीनं (ICC) आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.
नवव्या ओव्हरमध्ये पंतनं जबदरस्त फिल्डिंग करत धोनीची आठवण करून दिली. राहुल चाहरच्या पहिल्या चेंडूवर नामीबीयाचा फलंदाज लोफ्टी इटॉननं बॅकवर्ड स्वेअर लेगकडे शॉट खेळत एक धाव घेतली. या ठिकाणी कोणातही फिल्डर उभा नव्हता. यासाठी पंतनं घावत जात चेंडू स्टम्प्सच्या दिशेनं फेकला. विशेष म्हणजे त्यानं मागे न पाहता चेंडू स्टम्प्सच्या दिशेने फेकला. या ठिकाणी रोहित शर्मा उभा होता. यानंतर फॅन्सनं पंत याने धोनीची आठवण करून दिल्याचं म्हटलं. धोनी कायम याच स्टाईलमध्ये फिल्डिंग करण्यास प्रसिद्ध होता. अनेकदा त्याला फलंदाजाला आऊट करण्यातही यश मिळालं होतं.
भारताला टी २० विश्वचषक सामन्याच्या सेमी फायनलमध्येही प्रवेश मिळवता आला नाही. परंतु भारतानं अखेरचे तीन सामने जिंकत विजयाची हॅटट्रीक लगावली. अखेरच्या तीन सामन्यांमध्ये भारतीय संघानं जबरदस्त कामगिरी केली. भारतीय संघानं विजयानं ट्वेंटी -२० वर्ल्ड कप स्पर्धेचा निरोप घेतला.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली अखेरचा ट्वेंटी-२० सामना खेळणाऱ्या टीम इंडियानं सोमवारी ग्रुप २ मधील अखेरच्या साखळी सामन्यात नामिबियावर दणदणीत विजयाची नोंद केली. आर अश्विन व रवींद्र जडेजा यांच्या दमदार कामगिरीनंतर रोहित शर्मानं ( Rohit Sharma) चांगली फटकेबाजी केली. नशीबाचीही रोहितला बरीच साथ मिळाली. रोहित व लोकेश राहुल यांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावताना टीम इंडियाला सहज विजय मिळवून दिला.