इंडियन प्रीमिअर लीग २०२१ संपल्यानंतर दोनच दिवसांत यूएई व ओमान येथे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि सपोर्ट स्टाफ २ ऑक्टोबरला यूएईल दाखल होतील. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय संघाला मेंटॉरम्हणून माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे ( MS Dhoni) मार्गदर्शन लाभणार आहे. अशात सध्या चेन्नई सुपर किंग्सचा संघ दुबईत ज्या हॉटेलमध्ये थांबला आहे, तेथेच रवी शास्त्री अँड टीम शनिवारी उतरणार आहे. त्यामुळे २ ऑक्टोबरपासूनच ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठीच्या रणनीतीची आखणी सुरू झाल्यास आश्चर्य वाटायला नको. भारत ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा २४ ऑक्टोबरला सामना करणार आहे. भारताचे बहुतांश खेळाडू सध्या आयपीएलमध्ये खेळत आहेत आणि आयपीएल फायनलनंतरच हे सर्व खेळाडू एकत्रित येतील.
सूर्यकुमार, इशान, हार्दिक यांना वर्ल्ड कप संघातून वगळले जाऊ शकते का?; जाणून घ्या ICCचा नियम
बीसीसीआयच्या सूत्रांनी ANIला दिलेल्या माहितीनुसार भारतीय संघ दी पाम हॉटेलमध्ये थांबणार आहे. अद्याप यावर शिक्कामोर्तब झालेले नाही. पण, बीसीसीआय याच हॉटेलचा विचार करत आहे. टीम इंडियाचा कोचिंग स्टाफ २ ऑक्टोबरला दुबईत याच हॉटेलमध्ये सहा दिवसांसाठी क्वारंटाईन राहणार आहे. त्यानंतर ते ट्वेंटी-२० वर्ल्ड कप साठीच्या बायो बबलमध्ये प्रवेश करतील. १७ ऑक्टोबरपासून वर्ल्ड कपला सुरूवात होईल. ओमान व पापुआ न्यू गिनी यांच्यात राऊंड १ ग्रुप बीमधील सामन्यानं स्पर्धेला सुरुवात होईल.
भारतीय संघ ( India T20 WorldCup squad) - आघाडीची फळी - विराट कोहली, रोहित शर्मा, लोकेश राहुल; मधली फळी - सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, इशान किशन; अष्टपैलू खेळाडू - हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल; फिरकीपटू - राहुल चहर, आर अश्विन, वरुण चक्रवर्थी; जलदगती गोलंदाज - जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी; राखीव खेळाडू - शार्दूल ठाकूर, श्रेयस अय्यर, दीपक चहर
BCCIनं विराट कोहलीला खिजगणतीतही नाही धरलं; T20 World Cup साठी दोन मोठे निर्णय घेतले
भारतीय संघाचे वेळापत्रक२४ ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, दुबई, वेळ सायंकाळी ७.३० वाजता३१ ऑक्टोबर - भारत वि. न्यूझीलंड, दुबई, वेळ सायंकाळी ७.३० वाजता३ नोव्हेंबर - भारत वि, अफगाणिस्तान, अबु धाबी, वेळ सायंकाळी ७.३० वाजता५ नोव्हेंबर - भारत वि. ब गटाती अव्वल, दुबई, वेळ सायंकाळी ७.३० वाजता८ नोव्हेंबर - भारत वि. अ गटातील उपविजेता, दुबई, सायंकाळी ७.३० वाजताउपांत्य फेरीचे सामने -१० नोव्हेंबर आणि ११ नोव्हेंबर अंतिम सामना - १४ नोव्हेंबर