Join us

ICC T20I Rankings: तिलक वर्माची हवा; लवकरच ट्रॅविस हेडचा 'करेक्ट कार्यक्रम' होणार भावा!

युवा स्टार तिलक वर्मा याने एका स्थानांनी झेप घेत कारकिर्दीतील सर्वोत्तम रँकिंगसह केली हवा, आता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 16:24 IST

Open in App

ICC T20I Rankings : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची टी-२० मालिका सुरु आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) नवी क्रमवारी जाहीर केली आहे. यात फलंदाजांच्या टी-२० क्रमवारीत मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. भारतीय संघातील युवा स्टार तिलक वर्मा याने एका स्थानांनी झेप घेत कारकिर्दीतील सर्वोत्तम रँकिंगसह इतिहास रचलाय. तो टी-२० क्रिकेटमधील फलंदाजांच्या क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

तिलक वर्माची दुसऱ्या स्थानावर झेप; नंबर वन कोण?

आयसीसीच्या फलंदाजांच्या टी-२० क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज ट्रॅविस हेड अव्वलस्थानावर आहे. सध्याच्या घडीला त्याच्या खात्यात ८५५ गुण जमा आहेत. तिलक वर्मानं एका स्थानी झेप घेत दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. त्याच्या खात्यात आता ८३२ रेटिंग पॉइंट्स असून तो पहिल्यांदा नंबर दोनच्या स्थानापर्यंत पोहचला आहे.

युवा बॅटर तिलक वर्मा देतोय टॉपला ट्रॅविस हेडला टक्कर

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्यानंतर तिलक वर्माच्या खात्यात ८४४ रेटिंग पॉइंट्स होते. तिसऱ्या टी-२० सामन्यात त्याचा नाबाद खेळीचा सिलसिला मोडला. तो मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. अन् रँकिंगमध्ये  १२ पॉइंट्सनं घसरण झाली. इंग्लंड विरुद्धच्या उर्वरित दोन सामन्यात त्याचे तेवर दिसले तर ट्रॅविस हेडला बाजूला सारून तो नंबर वनचा ताज मिळवू शकतो. 

सूर्यकुमार यादव आणि जॉस बटलर 'जैसै थे' 

इंग्लंडचा सलामीवीर फिल सॉल्ट याला सातत्याने खराब कामगिरीचा फटका बसला असून तो ७८२ रेटिंग पॉइंट्ससह दुसऱ्या स्थानावरुन तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवच्या भात्यातूनही धावा होताना दिसत नाहीत. तो ७६३ रेटिंग सह चौथ्या क्रमांकावर असून इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर ७४९ रेटिंग पॉइंट्ससह टॉप ५ मध्ये टिकून आहे. त्यानंतर बाबर आझम आणि पथुम निसंका अनुक्रमे सहाव्या सातव्या स्थानावर आहेत. 

मोहम्मद रिझवान फायद्यात यशस्वी जैस्वालला बसला फटका

पाकिस्तानी संघाचा कर्णधार मोहम्मद रिझवान याला मॅच न खेळता फायदा झाला आहे. दुसरीकडे भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल तोट्यात आहे  मोहम्मद रिझवान ७०४ रेटिंगसह आठव्या तर यशस्वी जैस्वाल ६८६ रेटिंगसह नवव्या स्थानावर आहे.  श्रीलंकेच्या कुशल परेरानं ६७५ रेटिंगसह टॉप टेनमध्ये आपलं स्थान टिकवलं आहे. 

टॅग्स :तिलक वर्माभारत विरूद्ध इंग्लंड २०२५आयसीसीभारत विरुद्ध इंग्लंडसूर्यकुमार अशोक यादवजोस बटलर