Join us  

T20 World Cup स्पर्धेतील आव्हान संपल्यानंतर न्यूझीलंडच्या खेळाडूवर ICC ची कारवाई

केन विलियम्सनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या न्यूझीलंड संघाला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या साखळी गटातच गाशा गुंडाळावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 11:18 PM

Open in App

T20 World Cup exit - केन विलियम्सनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या न्यूझीलंड संघाला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या साखळी गटातच गाशा गुंडाळावा लागला. क गटात न्यूझीलंडला पहिल्या दोन सामन्यांत अफगाणिस्तान व वेस्ट इंडिजकडून हार पत्करावी लागली. या दोन्ही संघांनी सलग तीन विजय मिळवून या गटातून सुपर ८ मध्ये आपले स्थान निश्चित केले आणि किवींना बाहेर फेकले. स्पर्धेतील आव्हान संपल्यानंतर न्यूझीलंडचा गोलंदाज टीम साऊदी ( Tim Southee ) याच्यावर आयसीसीने कारवाई केली.

साऊदीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात नियमाचे उल्लंघन केल्यामुळे अडचणीत आला. त्याने खेळाडूंसाठी आयसीसी आचारसंहितेचा लेव्हल १ गुन्हा मोडला. त्रिनिदाद येथील ब्रायन लारा क्रिकेट अकादमीमध्ये बुधवारी हा प्रकार घडला. खेळाडू आणि खेळाडू सहाय्य कर्मचाऱ्यांसाठीच्या ICC आचारसंहितेच्या अनुच्छेद २.२ चे ( ज्याचा अर्थ "आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान क्रिकेट उपकरणे किंवा कपडे, मैदानी उपकरणे किंवा फिक्स्चर आणि फिटिंगचा गैरवापर" आहे. ) उल्लंघन केल्याबद्दल साऊदी दोषी आढळला. 

साऊदीचा हा दोन वर्षांतील पहिला गुन्हा होता, परंतु तरीही त्याने त्याच्या रेकॉर्डवर एक डिमेरिट पॉइंट मिळवला. १८व्या षटकात तो आऊट झाल्यानंतर हा सगळा प्रकार घडला.  लॉकर रूममध्ये परत जाताना त्याने एक हँड सॅनिटायझर डिस्पेंसर तोडला. अहसान रझा, ॲलेक्स व्हार्फ, रिचर्ड इलिंगवर्थ (तिसरे पंच) आणि मायकेल गफ (चौथे पंच) या पंचंनी ही घटना पाहिली. त्यांनी साऊदीवर लेव्हल १ गुन्ह्याचा आरोप लावण्याचे ठरवले.    

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024न्यूझीलंडवेस्ट इंडिजआयसीसी