भारतीय संघ वर्ल्ड कपनंतर 15 दिवसांत विंडीज दौऱ्यावर, टेस्ट चॅम्पियन्सशीपचा श्रीगणेशा

वर्ल्ड कप स्पर्धा संपल्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 12:03 PM2019-06-13T12:03:15+5:302019-06-13T12:04:30+5:30

whatsapp join usJoin us
ICC Test Championship: India to kick-start their campaign against West Indies | भारतीय संघ वर्ल्ड कपनंतर 15 दिवसांत विंडीज दौऱ्यावर, टेस्ट चॅम्पियन्सशीपचा श्रीगणेशा

भारतीय संघ वर्ल्ड कपनंतर 15 दिवसांत विंडीज दौऱ्यावर, टेस्ट चॅम्पियन्सशीपचा श्रीगणेशा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : वर्ल्ड कप स्पर्धा संपल्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. आयसीसीच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप ( कसोटी अजिंक्यपद स्पर्धा) स्पर्धे अंतर्गत भारतीय संघ 22 ऑगस्टपासून दोन कसोटी सामने खेळणार आहे. पाच आठवड्यांच्या या दौऱ्यात भारतीय संघ तीन ट्वेंटी-20 व तीन वन डे सामनेही खेळणार आहे. 22 ते 26 ऑगस्ट दरम्यान व्हिव्हियन रिचर्ड्स क्रिकेट ग्राऊंड, अँटीग्वा आणि 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर दरम्यान जमैका येथील सबीना पार्कवर कसोटी सामना खेळवण्यात येईल.  

आयसीसीच्या नवीन कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला याच मालिकेतून सुरुवात होत आहे आणि पुढील दोन वर्ष ही स्पर्धा सुरू राहणार आहे. ''वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात कसोटी क्रिकेटमध्ये नेहमीच चुरस पाहायला मिळाली आहे. त्याशिवाय जगातील सर्वोत्तम खेळाडू ट्वेंटी-20 आणि वन डे क्रिकेटमध्येह एकमेकांना भिडतील,'' अशी माहिती वेस्ट इंडिज क्रिकेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉनी ग्रेव्ह यांनी दिली. 


वर्ल्ड कपनंतर भारत दौऱ्यावर येणार 'तीन' बलाढ्य संघ, बीसीसीआयनं केलं वेळापत्रक जाहीर
मुंबई : वर्ल्ड कप स्पर्धेनंतर एका महिन्याची विश्रांती घेत भारतीय क्रिकेट संघ पुन्हा एकदा मैदानावर उतरणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सोमवारी 2019-20च्या हंगामातील घरच्या मैदानावरील मालिकांचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार भारतीय संघ घरच्या मैदानावर 5 कसोटी, 9 वन डे आणि 12 ट्वेंटी-20 सामने खेळणार आहे. आगामी 2020 ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून बीसीसीआयनं झटपट क्रिकेट सामन्यांना प्राधान्य दिले आहे.


या हंगामाची सुरुवात फ्रिडम चषक गांधी-मंडेला मालिकेनं होणार आहे. 15 सप्टेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन ट्वेंटी-20 व तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध तीन ट्वेंटी-20 व 2 कसोटी सामने खेळेल.  वेस्ट इंडिजचा संघ तीन ट्वेंटी-20 आणि तीन वन डे सामन्यांची मालिका खेळण्यासाठी डिसेंबरला भारतात येणार आहे. त्यानंतर मेन इन ब्लू झिम्बाब्वेविरुद्ध तीन ट्वेंटी-20 सामने खेळतील. त्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाशी दोन हात करेल. दक्षिण आफ्रिका पुन्हा भारत दौऱ्यावर येणार आहे.

असे आहे वेळापत्रक 2019-2020
फ्रिडम चषक -2019 (वि. दक्षिण आफ्रिका)
15 सप्टेंबर - पहिली ट्वेंटी-20, धर्मशाला
18 सप्टेंबर - दुसरी ट्वेंटी-20, मोहाली
22 सप्टेंबर - तिसरी ट्वेंटी-20, बंगळुरू 
2 ते 6 ऑक्टोबर - पहिली कसोटी, विशाखापट्टणम
10 ते 14 ऑक्टोबर - दुसरी कसोटी, रांची
19 ते 23 ऑक्टोबर - तिसरी कसोटी, पुणे

बांगलादेशचा भारत दौरा
3 नोव्हेंबर - पहिली ट्वेंटी-20, दिल्ली
7 नोव्हेंबर - दुसरी ट्वेंटी-20, राजकोट
10 नोव्हेंबर - तिसरी ट्वेंटी-20, नागपूर
14 ते 18 नोव्हेंबर- पहिली कसोटी, इंदूर
22 ते 26 नोव्हेबर - दुसरी कसोटी, कोलकाता

वेस्ट इंडिजचा भारत दौरा
6 डिसेंबर - पहिली ट्वेंटी-20, मुंबई
8 डिसेंबर - दुसरी ट्वेंटी-20, तिरुवनंतपुरम 
11 डिसेंबर - तिसरी ट्वेंटी-20, हैदराबाद
15 डिसेंबर - पहिली वन डे, चेन्नई
18 डिसेंबर - दुसरी वन डे, विशाखापट्टणम
22 डिसेंबर - तिसरी वन डे, कटक 

झिम्बाब्वेचा भारत दौरा - 2020
5 जानेवारी - पहिली ट्वेंटी-20, गुवाहाटी
7 जानेवारी - दुसरी ट्वेंटी-20, इंदूर
10 जानेवारी - तिसरी ट्वेंटी-20, पुणे
 
ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा - 2020
14 जानेवारी - पहिली वन डे, मुंबई
17 जानेवारी - दुसरी वन डे, राजकोट
19 जानेवारी - तिसरी वन डे, बंगळुरू 

दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा - 2020
12 मार्च - पहिली वन डे, धर्मशाला
15 मार्च - दुसरी वन डे, लखनऊ
18 मार्च - तिसरी वन डे, कोलकाता 

Web Title: ICC Test Championship: India to kick-start their campaign against West Indies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.