मुंबई : वर्ल्ड कप स्पर्धा संपल्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. आयसीसीच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप ( कसोटी अजिंक्यपद स्पर्धा) स्पर्धे अंतर्गत भारतीय संघ 22 ऑगस्टपासून दोन कसोटी सामने खेळणार आहे. पाच आठवड्यांच्या या दौऱ्यात भारतीय संघ तीन ट्वेंटी-20 व तीन वन डे सामनेही खेळणार आहे. 22 ते 26 ऑगस्ट दरम्यान व्हिव्हियन रिचर्ड्स क्रिकेट ग्राऊंड, अँटीग्वा आणि 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर दरम्यान जमैका येथील सबीना पार्कवर कसोटी सामना खेळवण्यात येईल.
आयसीसीच्या नवीन कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला याच मालिकेतून सुरुवात होत आहे आणि पुढील दोन वर्ष ही स्पर्धा सुरू राहणार आहे. ''वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात कसोटी क्रिकेटमध्ये नेहमीच चुरस पाहायला मिळाली आहे. त्याशिवाय जगातील सर्वोत्तम खेळाडू ट्वेंटी-20 आणि वन डे क्रिकेटमध्येह एकमेकांना भिडतील,'' अशी माहिती वेस्ट इंडिज क्रिकेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉनी ग्रेव्ह यांनी दिली.
वर्ल्ड कपनंतर भारत दौऱ्यावर येणार 'तीन' बलाढ्य संघ, बीसीसीआयनं केलं वेळापत्रक जाहीरमुंबई : वर्ल्ड कप स्पर्धेनंतर एका महिन्याची विश्रांती घेत भारतीय क्रिकेट संघ पुन्हा एकदा मैदानावर उतरणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सोमवारी 2019-20च्या हंगामातील घरच्या मैदानावरील मालिकांचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार भारतीय संघ घरच्या मैदानावर 5 कसोटी, 9 वन डे आणि 12 ट्वेंटी-20 सामने खेळणार आहे. आगामी 2020 ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून बीसीसीआयनं झटपट क्रिकेट सामन्यांना प्राधान्य दिले आहे.
या हंगामाची सुरुवात फ्रिडम चषक गांधी-मंडेला मालिकेनं होणार आहे. 15 सप्टेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन ट्वेंटी-20 व तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध तीन ट्वेंटी-20 व 2 कसोटी सामने खेळेल. वेस्ट इंडिजचा संघ तीन ट्वेंटी-20 आणि तीन वन डे सामन्यांची मालिका खेळण्यासाठी डिसेंबरला भारतात येणार आहे. त्यानंतर मेन इन ब्लू झिम्बाब्वेविरुद्ध तीन ट्वेंटी-20 सामने खेळतील. त्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाशी दोन हात करेल. दक्षिण आफ्रिका पुन्हा भारत दौऱ्यावर येणार आहे.
असे आहे वेळापत्रक 2019-2020फ्रिडम चषक -2019 (वि. दक्षिण आफ्रिका)15 सप्टेंबर - पहिली ट्वेंटी-20, धर्मशाला18 सप्टेंबर - दुसरी ट्वेंटी-20, मोहाली22 सप्टेंबर - तिसरी ट्वेंटी-20, बंगळुरू 2 ते 6 ऑक्टोबर - पहिली कसोटी, विशाखापट्टणम10 ते 14 ऑक्टोबर - दुसरी कसोटी, रांची19 ते 23 ऑक्टोबर - तिसरी कसोटी, पुणे
बांगलादेशचा भारत दौरा3 नोव्हेंबर - पहिली ट्वेंटी-20, दिल्ली7 नोव्हेंबर - दुसरी ट्वेंटी-20, राजकोट10 नोव्हेंबर - तिसरी ट्वेंटी-20, नागपूर14 ते 18 नोव्हेंबर- पहिली कसोटी, इंदूर22 ते 26 नोव्हेबर - दुसरी कसोटी, कोलकाता
वेस्ट इंडिजचा भारत दौरा6 डिसेंबर - पहिली ट्वेंटी-20, मुंबई8 डिसेंबर - दुसरी ट्वेंटी-20, तिरुवनंतपुरम 11 डिसेंबर - तिसरी ट्वेंटी-20, हैदराबाद15 डिसेंबर - पहिली वन डे, चेन्नई18 डिसेंबर - दुसरी वन डे, विशाखापट्टणम22 डिसेंबर - तिसरी वन डे, कटक
झिम्बाब्वेचा भारत दौरा - 20205 जानेवारी - पहिली ट्वेंटी-20, गुवाहाटी7 जानेवारी - दुसरी ट्वेंटी-20, इंदूर10 जानेवारी - तिसरी ट्वेंटी-20, पुणे ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा - 202014 जानेवारी - पहिली वन डे, मुंबई17 जानेवारी - दुसरी वन डे, राजकोट19 जानेवारी - तिसरी वन डे, बंगळुरू
दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा - 202012 मार्च - पहिली वन डे, धर्मशाला15 मार्च - दुसरी वन डे, लखनऊ18 मार्च - तिसरी वन डे, कोलकाता